२६ नोव्हेंबर, २००८ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही लक्ष्य केले होते. या घटनेला या वर्षी ११ वर्षे पूर्ण झाली. एवढ्या कालावधीनंतरही रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने फारशी सकारात्मक पावले उचलली नसल्याचे मत ‘लोकमत’ वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’ या व्यासपीठावर व्यक्त केले. मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही यंत्रणा, हँड मेटल डिटेक्टर कुचकामी आहेत. अशी एखादी घटना घडल्यानंतर प्रशासन तेवढ्यापुरती खबरदारी घेते. परिणमी, उपनगरीय स्थानकातील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे निरीक्षण वाचकांनी नोंदवले.असुरक्षितता जाणवतेच!रेल्वेचा प्रवास मग तो उपनगरी लोकलमधून असो वा मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधून असो, प्रवाशांना मोठीच कसरत करावी लागते. आपला प्रवास सुखाचा होवो, ही घोषणा ऐकायला मिळते. मात्र, खरोखरच प्रवाशांना सुरक्षितता वाटतो का, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण कधी अपघात, घातपात होईल, याची शाश्वती नाही. मुंबई परिसरातील वा देशातील अनेक स्थानके असो ही प्रवाशांनी तुडुंब भरलेली असतात, अधूनमधून स्थानकांवर आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये, त्याचप्रमाणे लोकलच्या लेडिज डब्यात रेल्वे पोलिसांची उपस्थिती दिसते. मात्र, प्रवाशी हे भीतीच्या छायेतच प्रवास करीत असतात, हे सत्य आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर नेहमीच चर्चा होते. रेल्वे प्रशासन प्रवाशांवर तिकिटाव्यतिरिक्त सुरक्षा अधिभाराच्या नावाखाली अधिकचा भार टाकला जातो. मात्र, तरीही प्रवासी सुरक्षित आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. वास्तविक, गाड्यांमधील आणि स्थानकांवरील गर्दीचे योग्य पद्धतीने नियंत्रण व्हायलाच हवे, तसेच स्थानकांच्या प्रवेशद्वारात मेट्रो स्थानकांप्रमाणे मुबलक प्रमाणात मेटल डिटेक्टर बसवून काटेकोरपणे अंमलबजावणी करीत प्रवेश दिले गेले पाहिजेत.- अनंत बोरसे, शहापूर, ठाणेउपाययोजना राबविताना गांभीर्य हवेसुमारे दहा वर्षांपूर्वी मुंबईत दहशतवादी हल्ल्यानंतर गर्दीच्या रेल्वे स्थानकांत सुरक्षेसाठी वेगवेगळे उपाय योजले गेले. रेल्वे स्थानकात प्रवेशासाठी स्कॅनिंग मशिन्स, सीसीटिव्ही कॅमेरे बसविले. बंदूकधारी पोलिसांची गस्त ठेवली गेली. हे सर्व जेमतेम वर्षभर सुरू होते. त्यानंतर, तणावाचा विसर पडून ही सुरक्षा सैल झाली, हल्ल्यांचे गांभीर्य कुणालाही उरले नाही. प्रवासी, रेल्वे सर्वांनाच या सुरक्षेचा अडथळा होऊ लागला. मात्र, हल्ल्यांचे सल आणि भय तसेच आहे. सर्व प्रशासनांनी सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना आखून त्यांची गंभीरतेने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनिंग मशिन्स यांची नियमित निगा, तपासणी सक्तीची करावी. कॅमेऱ्यांमार्फत प्रत्यक्ष देखरेख ठेवावी. संशयास्पद वस्तू, व्यक्ती यांची ताबडतोब हटकून तपासणी करण्याची सवय लावून घ्यावी. कर्मचाºयांना बचाव करण्याचे प्रशिक्षण देऊन जागृत ठेवावे. त्यामुळे त्यांच्या सतर्कतेमुळे संकटसमयी गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही.- राजन पांजरी, जोगेश्वरी.रेल्वे प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यामुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली. अनेक उपनगरी रेल्वे स्थानकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले व प्रवेशद्वारांवर डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसविण्यात आले, परंतु आताच्या घडीला ही सुरक्षा व्यवस्था परिणामकारक नाही. प्रवाशांच्या तुलनेत रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाºयांची संख्याही पुरेशी नाही. रेल्वे स्थानकात व लोकलमध्ये भिकारी, गर्दुल्ले, तृतीयपंथी, अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा मुक्त संचार असतो. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यातच रेल्वे स्थानकात पाकीटमार, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा मुक्त वावर वाढत असताना, रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अपयशी ठरले आहे. रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.- प्रदीप मोरे, अंधेरी (पू)नेहमीच सतर्क राहणे आवश्यकरेल्वेतील बॉम्बस्फोटानंतर स्कॅनिंग यंत्रे लावली, फलाटांवर सुरक्षारक्षक ठेवले, सीसीटीव्ही कॅमेरे लावले, काही प्रवाशांच्या बॅगा तपासल्या, डब्यांमधील सामानाचे कॅरियर काढून टाकले. अशा प्रकारांची सुरक्षा जेव्हा एखादा अपघात, हल्ले झाल्यावर तात्पुरत्या स्वरूपात सुरू करतात. त्याऐवजी त्यांनी नेहमीच सतर्क राहणे आवश्यक आहे. दहशतवादी हल्ले थांबले आणि सुरक्षेची बंधने शिथिल झाली. नेमलेल्या सुरक्षारक्षकांना कायम प्लॅटफॉर्मवर नेमल्यास हल्ले करण्याची संधी सहज मिळेल, असे वाटत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत खºया अर्थाने वाढ होईल. पूर्वी लावलेली स्कॅनिंग यंत्रे, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत की नाही, याची खात्री देता नाही. एखाद्या संकटसमयी त्या सुरक्षायंत्रणा किती यशस्वीतेने तोंड देतील, याची कुणालाच खात्री नाही. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किती गांभीर्य हे यावरून स्पष्ट होते, पण हे चित्र बदलण्यासाठी रेल्वेने पूर्वी लावलेली सुरक्षेची मशिन्स जेथे-जेथे बंद आढळतील, तेथे ती पुन्हा कार्यरत करावीत, जुनी यंत्रणा बदलून अद्ययावत सुरक्षा यंत्रणा बसवावी. त्यांच्या कार्यावर आणि कार्यक्षमतेवर लक्ष ठेवणारे कर्मचारी नेमावेत. रेल्वे परिसरात रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहने, फेरीवाले यांना मनाई करण्यासाठी स्थानिक पालिका कर्मचाºयांना साहाय्य केल्यास सुरक्षितता निश्चित वाढेल. - स्नेहा राज, गोरेगाव.घोषणा नकोत, ठोस पावले उचला!लोकलमध्ये प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी रेल्वे प्रशासनाने द्यायला हवी. मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या शहरातून रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात प्रवासीभाडे मिळते. याउलट रेल्वे प्रशासन मुंबईकरांना आवश्यक त्या सोईसुविधा पुरविण्यात सातत्याने अपयशी ठरताना दिसते. मुंबईकरांच्या सुरक्षेबाबतही अजूनपर्यंत काही ठोस केले गेले नाही. रेल्वे अपघातात कित्येकांचे अजूनही बळी जात आहेत. लोकलवर दगडफेक करणाºयांच्या मुसक्या आवळण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलेले नाही. महिला सुरक्षेबाबतही तीच अवस्था आहे. आपल्या रेल्वे स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था पुरेशी नाही. एखादी आतंकवादी दुर्घटना घडल्यास त्याचा सामना आपण कसे करणार? यासारखे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे फक्त घोषणा करून काही उपयोग नाही. रेल्वे प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज आहे.- उदय वाघवणकर, जोगेश्वरी (पूर्व).स्वतंत्र यंत्रणा हवीरेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा असला तरी, त्याकडे दुर्लक्ष होते. मात्र, सुविधांसोबत प्रवाशांची सुरक्षादेखील तितकीच महत्त्वाची आहे, हे सूत्र अजून रेल्वे मंत्रालयाला उमगलेले नाही, ही दुदैवाची गोष्ट आहे. २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाताना स्थानकावर सीसीटीव्ही, मेटल डिटेक्टर, कमांडो आदी उपाय केले आहेत. मात्र, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा तितका गांभीर्याने पाहिला जात नाही. ही समस्या सोडविण्यासाठी जादा पोलीस नियुक्त करणे हा एकमेव उपाय आहे. होमगार्डच्या जवानांचीही मदत घेतली जाऊ शकते. अशाच पद्धतीने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे हाच पर्याय आहे.- कमलाकर जाधव, बोरीवलीरेल्वे, पोलीस आणि प्रवाशांनी एकत्र यावे!२६/११चा दिवस आठवला, तर आजही अंगावर शहारे येतात. यंदा त्या घटनेला ११ वर्षे पूर्ण होतील. मात्र, त्या भयानक घटनेने असूनही रेल्वे प्रशासनाला जाग आलेली नाही. रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बल यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे जीव आजही धोक्यात आहेत. आजही कोणत्याच स्थानकावर सामानांची वा प्रवाशांची तपासणी होत नाही. तिकीट तपासनीस फुकट्या प्रवाशांकडून चिरीमिरी घेण्यात व सुरक्षा पाहणारी यंत्रणा विक्रेत्यांना स्थानकाच्या आवारात बसवून धन्यता मानतात. दिवसेंदिवस सतत वाढत जाणारी गर्दी पाहता कधीही, कुठेही एखादी घातपाताची घटना घडू शकते. हे टाळण्यासाठी सर्व स्थानके पुरेशा सुरक्षा उपकरणांनी व प्रशस्त प्रवेशद्वारांनी सज्ज असावीत. स्थानकात फेरीवाल्यांना प्रवेश देऊ नये. गर्दुल्ल्यांना स्थानकापासून दूर ठेवावे. नियमित प्रवास करणाºया प्रवाशांना रेल्वे सुरक्षा मित्र ओळखपत्र देऊन त्यांचीही मदत घेतली पाहिजे. प्रशासन, पोलीस आणि प्रवासी या तिघांनी एकत्र येऊन कामे हाती घेतली पाहिजे.- कन्हैया नलगोंडा, ठाणे
प्रवाशांवर असुरक्षिततेची टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 2:45 AM