आत आदित्य ठाकरे बैठक घेत होते, बाहेर स्लॅबसह झुंबर कोसळलं; सह्याद्री अतिथगृहातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 09:06 PM2021-06-04T21:06:43+5:302021-06-04T21:07:35+5:30
सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सर्वजण सुखरुप आले बाहेर.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. सह्याद्री अतिगृहात यावेळी बैठक सुरू होती. या ठिकाणी असलेल्या हॉल क्रमांक ४ बाहेरील स्लॅबसह झुंबर अचानक कोसळल्यानं एकच खळबळ उडाली. यानंतर सह्याद्री अतिगृहात असलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर हलवण्यात आलं. (slab of sahyadri guest house collapsed no injuries)
शुक्रवारी सायंकाळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या ठिकाणी एका बैठकीसाठऑी आले होते. पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह त्यांची आत बैठक सुरू होती. याचवेळी पीओपी स्लॅबसह झुंबर खाली कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही.
दरम्यान, हे बांधकाम २५ वर्षांपूर्वीचे असून या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आहे. अहवाल आल्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान यानंतर त्वरित दुरूस्तीच्या कामालाही सुरूवात करण्यात आली.
"महाराष्ट्रासाठी ही फारच क्लेशदायक आणि धक्कादायक घटना आहे. आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व कर्मचारी सुखरूप आहेत हे महत्त्वाचे. छत कोसळत आहे हे लक्षात आल्यावर प्रसंगावधान दाखवलं गेलं हे चांगलं असलं तरी या बांधकामाची आणि घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी," अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केली आहे.