Join us

उर्मिलाच्या राजीनाम्यामागची वेगळी स्टोरी; 'फिल्मी स्टाईल'ला कंटाळले होते काँग्रेस कार्यकर्ते!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 5:33 PM

पक्षात किंमत राहिली नसल्याने अभिनेत्री व काँग्रेसच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यामागची एक वेगळीच गोष्ट समोर येत आहे.

मनोहर कुंभेजकरमुंबई - पक्षात किंमत राहिली नसल्याने अभिनेत्री व काँग्रेसच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षाचा  राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यामागची एक वेगळीच गोष्ट समोर येत आहे. 

लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईत काँग्रेस आघाडीच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा सुमारे 4,64,028 मतांनी भाजपा चे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी दारुण पराभव केला.त्यामुळे हताश झालेल्या उर्मिला मातोंडकर यांनी त्यांच्या 10 जुलैच्या पत्राद्वारे पराभवाचे खापर निरुपम समर्थकांवर कारवाई करा, अशी मागणी उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलींद देवरा यांना केली होती.निरुपम समर्थक भूषण पाटील, अशोक सूत्राळे आणि संदेश कोंडविलकर यांनी आपल्या निवडणुकीत कामे केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मातोंडकर यांची मागणी होती .देवरा यांनी यावर काही कारवाई केली नाही.देवरा बदलले आणि आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड आले.आपल्या मागणीला पक्षाच्या नेत्यांकडून  केराची टोपली दाखवली जाते,आपल्या समर्थकांची मुंबई काँग्रेस कार्यकरणीत वर्णी लागत नाही.त्यामुळे आपल्या मागणीला पक्षात काही किंमत राहिली नसल्याने अखेर त्यांनी हताश होऊन राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलतांना दिली.

लोकसभा निवडणूक हरल्या नंतर  अलिकडेच त्या पुन्हा पक्षात कार्यरत झाल्या होत्या.गेल्या महिन्यात त्यांनी उत्तर मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यां समवेत सांगली व कोल्हापूरचा दौरा करून पूरग्रस्तांना मदत देखिल केली होती.तर दि,5 सप्टेंबर रोजी त्यानी मुंबापुरीची तुंबापुरी का झाली?यावर बोरीबली येथील पत्रकार परिषदेत जोरदार पालिका प्रशासन व राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.मात्र आता अचानक त्यांनी राजीनामा दिला.याचे कारण एक तर त्यांना वांद्रे पश्चिम मधून तिकीट पाहिजे किंवा आपल्याला पक्षात किंमत मिळावी यासाठी असू शकेल अशी माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.

 

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा असल्याचे समजते. त्यांच्या उमेदवारीला माजी खासदार प्रिया दत्त यांचा विरोध असल्याचे समजते. तर येथून माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी हे आपला पूर्वीचा अंधेरी पूर्व मतदार संघ बदलून वांद्रे पश्चिम येथून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे. त्यामुळे आपल्याला वांद्रे पश्चिम येथून तिकीट काही मिळणार नाही, अशी खात्री झाल्याने आज त्यांनी अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला असावा, अशी देखिल चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 उत्तर मुंबईचे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते देखिल उर्मिलाच्या फिल्मीस्टाईल कार्यपद्धतीला कंटाळले होते.त्या गटबाजी करतात,जर दसऱ्या कार्यकर्त्याशी बोलले की संशयाने बघतात असा आरोप सूत्रांनी लोकमतशी बोलतांना केला.

गेल्या आठवड्यात त्यांनी दहिसर विधानसभेत दि,5 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले.त्या आल्या,त्या गेल्या,मात्र त्यांची अतूरतेने वाट बघत असलेल्या  आमच्या मंडळांना वेळीसुद्धा दिला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची भूमिका समजू शकली नाही.

टॅग्स :उर्मिला मातोंडकरकाँग्रेसमुंबईराजकारण