पुनर्विकासातील घरांची म्हाडामार्फत होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:44 AM2019-12-20T00:44:59+5:302019-12-20T00:45:04+5:30

या वर्षी म्हाडाने मास्टर लिस्टमधील ९५ रहिवाशांना एकाच वेळी घरे वितरित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गेली अनेक वर्षे संक्रमण शिबिरामध्ये राहत असलेल्या रहिवाशांना आशेचा किरण निर्माण झाला होता.

Inspection of redevelopment houses through MHADA | पुनर्विकासातील घरांची म्हाडामार्फत होणार तपासणी

पुनर्विकासातील घरांची म्हाडामार्फत होणार तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुुनर्रचना मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्याने बृहद्सूचीमध्ये (मास्टर लिस्ट) केलेल्या घोटाळ्यामुळे म्हाडा आता सावध झाली आहे. यामुळे आतापर्यंत पुनर्विकास झालेल्या इमारतीतील रिक्त सदनिकांचे वितरण झालेल्या सर्वच रहिवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. या सदनिकांमधील रहिवाशांची नावे बृहद्सूचीमध्ये (मास्टर लिस्ट) न आढळल्यास ही घरे म्हाडा ताब्यात घेणार आहे.
या वर्षी म्हाडाने मास्टर लिस्टमधील ९५ रहिवाशांना एकाच वेळी घरे वितरित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गेली अनेक वर्षे संक्रमण शिबिरामध्ये राहत असलेल्या रहिवाशांना आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र सहमुख्य अधिकारी अविनाश गोटे यांनी या यादीमध्ये पाच नावांचा समावेश करून घोटाळा केला. हा घोटाळा लक्षात आल्याने यापूर्वी अशा पद्धतीने किती घरे लाटली गेली, याबाबत शंका निर्माण झाल्याने मंडळाने पुनर्विकसित इमारतींमधील वितरित सदनिकांची माहिती मागवून तपशील गोळा करण्याचे म्हाडाने ठरवले आहे. घरे दलालांमार्फत लाटल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. या तक्रारींची शहानिशाही करण्यात येणार आहे.


जुनी किंवा धोकादायक ठरलेल्या इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत केले जाते़ मुळ कागदपत्रांच्याआधारे त्यांचे नाव मास्टर लिस्ट समाविष्ट केले जाते़ दलाल यामध्येच घोटाळा करतात़ म्हणून म्हाडाने हा निर्णय घेतला़

Web Title: Inspection of redevelopment houses through MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.