Join us

पुण्यातील फॉरेन्सिक पथकाकडून जप्त गाड्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:06 AM

एनआयए तयार करणार नव्याने अहवाललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जिलेटीनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओची मंगळवारी पुण्यातील फॉरेन्सिक पथकाने ...

एनआयए तयार करणार नव्याने अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जिलेटीनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओची मंगळवारी पुण्यातील फॉरेन्सिक पथकाने तपासणी केली. या कारसह जप्त केलेल्या पाचही गाड्यांचा फॉरेन्सिक अहवाल नव्याने तयार करण्यात येईल.

एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझेविरूद्ध सबळ पुरावे जमा केले जात आहेत. त्याची एनआयए कोठडीची मुदत २५ मार्चला संपत आहे. त्यानंतर मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी प्रमुख संशयित आरोपी असलेल्या वाझेला एटीएस अटक करणार आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी एटीएसने न्यायालयातून वाॅरंट मिळविले आहे. त्यामुळे त्याचा ताबा जाण्यापूर्वी सर्व तांत्रिक पुरावे जमवत आहेत. त्यासाठी पुण्यातील फॉरेन्सिक तंत्रज्ञांना बाेलावण्यात आले होते. मंगळवारी ते आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा जिलेटीन ठेवलेल्या स्काॅर्पिओची तपासणी केली. त्यानंतर जप्त केलेल्या अन्य गाड्यांची तपासणी करण्यात आली.