Join us

पुण्याच्या फॉरेन्सिक टीमकडून जप्त केलेल्या वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:06 AM

वाझेंंकडे १२ गाड्या...पुण्याच्या फॉरेन्सिक टीमकडून जप्त केलेल्या वाहनांची तपासणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ...

वाझेंंकडे १२ गाड्या...

पुण्याच्या फॉरेन्सिक टीमकडून जप्त केलेल्या वाहनांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात एनआयएच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. सचिन वाझेच्या अटकेनंतर जप्त केलेली वाहने, तसेच अन्य गोष्टींच्या तपासासाठी शुक्रवारी पुण्याची फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल झाली. सकाळपासून जप्त केलेल्या वाहनांची तपासणी करत त्यावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

एनआयएने गुरूवारी जप्त केलेल्या दोन वाहनांची तपासणी पुणे फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हे पथक मुंबईत दाखल झाले. आतापर्यंत एनआयएने या प्रकरणात एकूण पाच गाड्या जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये २५ फेब्रुवारी रोजी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाडीचा समावेश आहे. तर सचिन वाझे वापरत असलेल्या २ मर्सिडीज बेंज, लँड क्रूझर यांचाही समावेश आहे. या सर्वांची फॉरेन्सिक चाचणी करण्यात येत आहे.

.....

वाझेकडे १२ गाड्या असल्याचा संशय

आतापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार वाझे १२ गाड्या वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत एनआयएचे पथक अधिक तपास करत आहेत. तसेच ही वाहने वाझेच्या नावावर नाही. त्यांच्या भागीदार किंवा गुंतवणूकदार असलेल्या तीन कंपन्यांच्या नावावर आहेत. आतापर्यंत वाझेच्या ३ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात, २ मर्सिडीज बेंज, लँड क्रूझर यांचाही समावेश आहे. अन्य वाहनांचा सहभाग समोर येताच ती देखील जप्त करण्यात येणार असल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.

....