Join us

भावे नाट्यगृहाची आयुक्तांकडून पाहणी

By admin | Published: July 03, 2015 1:28 AM

महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाची पाहणी करून तेथील समस्यांचा आढावा घेतला. नाट्यकर्मी आणि मान्यवरांची एक समिती

नवी मुंबई : महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाची पाहणी करून तेथील समस्यांचा आढावा घेतला. नाट्यकर्मी आणि मान्यवरांची एक समिती स्थापन करून नाट्यगृहातील सोयी-सुविधांचा अहवाल तयार करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीनुसार आयुक्तांनी आजचा हा पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मनपाचे अधिकारी उपस्थित होते.कलाकारांच्या ग्रीन रूममधील असुविधा, स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, नाट्यगृहात उंदीर व घुशींचा सुळसुळाट, डासांचा उपद्रव, मोडकळीस आलेली आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, वातानुकूलित यंत्रणा, बंद पडलेले पंखे, छत व भिंतींचे निखळलेले प्लास्टर आदी बाबी मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. या सर्व प्रश्नांवर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त वाघमारे यांनी या शिष्टमंडळाला दिले. यावेळी महापालिकेचे प्रशासन विभागाचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शहर अभियंता मोहन डगांवकर, सह आयुक्त (भावे नाट्यगृह) दिवाकर समेळ, कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)