Join us

अनेकांच्या तक्रारीनंतर महापरीक्षा पोर्टल बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 3:05 AM

या परिक्षांचे आयोजन माहिती व तंत्रज्ञान महामंडळ यांच्याकडून करण्यात येते

मुंबई : शासनाच्या सर्व प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिनस्त कार्यालयात गट ब व गट क च्या पदभरतीसाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत महापरीक्षा पोर्टल बनवण्यात आले होते. याविषयीच्या शेकडो तक्रारीनंतर हे पोर्टल आता बंद करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.

या परिक्षांचे आयोजन माहिती व तंत्रज्ञान महामंडळ यांच्याकडून करण्यात येते. या परीक्षा एकाच सर्व्हिस प्रोव्हायडर कडून महाआयटीद्वारे घेण्यात येत होत्या. महापरीक्षा पोर्टल संदर्भात अनेक तक्रारी आल्यामुळे परीक्षा पध्दती सर्व समावेशक करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने एक आदेश जारी केला आहे. यानुसार आता गट क व गट ड च्या परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी नवीन निविदाप्रक्रिया राबवण्यात येईल. त्यासाठीची कार्यवाही महाआयटी मार्फत केली जाईल. हे पोर्टल बंद करावे यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी देखील आग्रह धरला होता. विद्यार्थ्यांनी यासाठी आंदोलने केली होती. मात्र तत्कालिन भाजप सरकारमध्ये आयटी विभाग पाहणाऱ्या एका खाजगी व्यक्तीच्या आग्रहाखातर हे काम विशिष्ट कंपनीला दिल्याचे आक्षेपही विद्यार्थ्यांनी घेतले होते.

टॅग्स :परीक्षा