Join us  

सौभाग्यवतींसाठी नेत्यांचा आग्रह

By admin | Published: February 18, 2015 1:05 AM

महापालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच पन्नास टक्के महिला आरक्षण लागू होणार आहे. १११ पैकी ५६ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत.

नामदेव मोरे - नवी मुंबईमहापालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच पन्नास टक्के महिला आरक्षण लागू होणार आहे. १११ पैकी ५६ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. सत्ता स्वत:च्या घरात राहावी यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी प्रयत्नशील असून, स्वत:ची पत्नी किंवा घरातील महिला सदस्यांना उमेदवारी देण्याचा अट्टाहास सुरू आहे. यामुळे वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या प्रामाणिक महिला कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिला आरक्षणाची महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अंमलबजावणी होणार आहे. प्रथमच ५६ महिला सदस्य सभागृहात जाणार आहेत. वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना नगरसेवक होण्याची संधी प्राप्त झाली होती. परंतु आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ज्या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले त्यांनी स्वत:च्या सौभाग्यवतींना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. जे पुरुष पदाधिकारी निवडणूक लढणार होते त्यांनीही स्वत:ची पत्नी किंवा नातेवाईकांना तिकीट देणार असल्याची घोषणा केली . शहरात लावण्यात येणारे होर्डिंग, सोशल मीडियामधून पाठविण्यात येणारे संदेश यामध्ये नगरसेवकांच्या पत्नीचे छायाचित्र दिसू लागले आहे. हळदीकुंकू समारंभ व पक्षाच्या कार्यक्रमामध्येही या महिलांचा वावर वाढू लागला आहे. आतापर्यंत कधीच पक्षाचे काम व सामाजिक कार्यात सहभाग नसताना फक्त पती किंवा घरातील कोणीतरी नगरसेवक आहे म्हणून या महिलांना तिकीट दिले जाणार असून, प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे. शहरातील सर्वच राजकीय पक्षांची महिला कार्यकारिणी आहे. बचत गट तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून महिला पदाधिकारी नियमितपणे पक्षाचे काम करत असतात. पक्षाचा मेळावा, सभा, प्रचार यामध्ये महिला पदाधिकारी यांचा मोठा सहभाग असतो. प्रामाणिकपणे संघटना वाढविण्यासाठी काम करणाऱ्या महिलांना निवडणुका जवळ आल्या की डावलण्यात येत आहे. सत्ता स्वत:च्या घरात ठेवण्यासाठी पक्षाच्या कामाशी काहीही सहभाग नसलेल्या घरातील महिलांना उमेदवारी दिली जाणार आहे. पक्षाचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना या आयत्यावेळी आलेल्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना महिला कार्यकर्त्यांचा सांभाळताना कसरत करावी लागेल.च्आरक्षणामुळे नगरसेवक झालेल्या ९० टक्के महिला कार्यकाळ संपला की सामाजिक व राजकीय क्षेत्रात दिसत नाहीत. परंतु ज्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले त्यांनी स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले आहे. च् पालिकेत नगरसेविका म्हणून काम करणाऱ्या मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँगे्रसचे महिला अध्यक्ष, विधान परिषद सदस्य ते भाजपाच्या माध्यमातून बेलापूर मतदार संघातून ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना पराभूत करून विजय मिळविला आहे. च्अत्यंत चांगल्या प्रकारे बचत गटही चालविले आहेत. त्यांच्याप्रमाणे माजी महापौर सुषमा दंडे, रंजना शिंत्रे, भारती कोळी, संगीता सुतार, रोहिणी भोईर, कमलताई पाटील व इतर काही महिलांनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले आहे. काही विद्यमान नगरसेविकांनीही सभागृहात स्वत:ची छाप पाडली आहे.निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी नगरसेवकांच्या सौभाग्यवती व नातेवाईक महिलांना तिकीट मिळणार हे वास्तव आहे. त्यामध्ये फारसा बदल होणार नाही. किमान ज्या महिलांना उमेदवारी दिली जाणार त्यांना निर्णयाचे अधिकार देण्यात यावेत. विकासकामांचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. ज्या महिलांना संधी मिळेल त्यांनीही त्या संधीचे सोने करून कामकाजावर छाप पाडावी. - वृषाली मगदूम,सामाजिक कार्यकर्त्या