ऑनलाइन प्रशिक्षणातून रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली स्फूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 02:04 AM2020-06-26T02:04:47+5:302020-06-26T02:04:51+5:30

कुर्ला, कळवा आणि सानपाडा ईएमयू कारशेड्समध्ये मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांची देखभाल करण्यात येत आहे तर ऑनलाइन प्रशिक्षणातून कामगारांना रिफ्रेश केले जात आहे.

Inspired railway employees through online training | ऑनलाइन प्रशिक्षणातून रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली स्फूर्ती

ऑनलाइन प्रशिक्षणातून रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली स्फूर्ती

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे आपले कर्तव्य पार पाडत आहे. मध्य रेल्वे लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी मालगाडी आणि पार्सल रेल्वे गाड्या चालवित आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार मध्य रेल्वेकडून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी २०० उपनगरी लोकल सेवा चालविण्यात येत आहेत. या लोकल गाड्यांच्या नियमित देखभालीसाठी मध्य रेल्वेच्या कुर्ला, कळवा आणि सानपाडा ईएमयू कारशेड्स सुरू आहेत. त्यामुळे कुर्ला, कळवा आणि सानपाडा ईएमयू कारशेड्समध्ये मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांची देखभाल करण्यात येत आहे तर आॅनलाइन प्रशिक्षणातून कामगारांना रिफ्रेश केले जात आहे.
मध्य रेल्वेतर्फे एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या आॅनलाइन प्रशिक्षणात कुर्ला, कळवा आणि सानपाडा कार शेडमधील ५९ कर्मचारी सहभागी झाले होते. मे आणि जूनमध्ये कुर्ला, कळवा आणि सानपाडा या तिन्ही कारशेडमधील २६२ कर्मचारी ईएमयू आढावा घेण्यासाठीच्या आॅनलाइन प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. तसेच रेल्वेच्या कारागीर कर्मचाºयांसाठी एका आठवड्याच्या कालावधीचे आॅनलाइन रिफ्रेशर कोर्स प्रशिक्षण बॅचेसमध्ये घेण्यात आले. ज्यामध्ये पहिल्या बॅचमध्ये ७३ आणि दुसºया बॅचमध्ये ५३ अशा १२६ कर्मचाºयांना आॅनलाइन रिफ्रेशर कोर्स प्रशिक्षण दिले जाते.
>प्रवाशांच्या सुरक्षेची होते तपासणी
नियमित अंतराने स्थिर रॅकच्या बॅटरी व्होल्टेज तपासणीसह सुरक्षा आणि संरक्षणाची तपासणी केली जाते. १००-५०० मीटर अंतराच्या मुव्हमेंट द्वारे अंडर-गियरचे परीक्षण केले जाते. दिवे, पंखे, स्विचेस, पीए / पीआयएस (पब्लिक अड्रेस/ इन्फर्मेशन सिस्टीम) यासारख्या प्रवाशांच्या सुविधांची तपासणी आणि लक्ष पुरविले जाते. विविध स्टॅबलिंग साइडिंगवर स्थिर सर्व रॅक्सच्या खिडक्या आणि दारे बंद करण्याबरोबर सीलिंग केली जाते; सर्व पँटोग्राफ खाली ठेवले जाते; बॅटरी स्विच विलग करण्यात येतो. स्किडसह सुरक्षित केलेले सुरक्षेच्या उद्देशाने आरपीएफकडे दिले जाते.

Web Title: Inspired railway employees through online training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.