Join us

मुंबई नद्यांवरील रडार ट्रान्समीटरमुळे मिळणार धोक्याची सूचना, पाच नद्या, दोन तलावांवर यंत्र बसविले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 3:03 AM

२६ जुलै २००५ रोजी मिठी नदीने मुंबईला मगरमिठीत घेतले होते. तसेच ओशिवरा, दहिसर या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पश्चिम उपनगरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील नदी आणि नाल्यांचे रुंदीकरण केले जात आहे.

मुंबई : अतिक्रमणामुळे नाल्यांमध्ये रूपांतरित झालेल्या नद्यांनी पावसाळ्यात धोक्याची पातळी ओलांडल्यास स्थानिक परिसरात पूर येतो. मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीवर प्रत्येक पावसाळ्यात पालिका यंत्रणा बारीक लक्ष ठेवत असते. मात्र आता मुंबईतील पाच प्रमुख नद्या आणि दोन तलावांवर रडार लेव्हल ट्रान्समीटर बसविण्यात आले आहेत. यामुळे पावसाळ्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली अथवा तलाव धोकादायकरीत्या ओव्हर फ्लो झाल्यास धोक्याचा इशारा आपत्कालीन नियंत्रण कक्षापर्यंत तात्काळ पोहोचणार आहे.२६ जुलै २००५ रोजी मिठी नदीने मुंबईला मगरमिठीत घेतले होते. तसेच ओशिवरा, दहिसर या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पश्चिम उपनगरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील नदी आणि नाल्यांचे रुंदीकरण केले जात आहे. तर आता या प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात नद्यांना येणाऱ्या पुराचा अंदाज येण्यासाठी रडार लेव्हर ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत. यामध्ये मिठी, ओशिवरा, पोयसर, दहिसर आणि वाकोला नदी व पवई, विहार तलावाचा समावेश आहे.गेल्या काही वर्षांमध्ये अतिवृष्टी होऊन मुंबईची तुंबापुरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी नाल्यांबरोबरच नद्यांच्या पातळीवरही महापालिकेने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. नद्यांना अचानक पूर आल्यास रहिवाशांना स्थलांतरित करण्याची वेळ येते. या आपत्कालीन स्थितीत जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका असतो. यासाठी आपत्कालीन स्थितीची माहिती मिळवून तातडीने उपाययोजना करण्यासाठी रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत.आणखी दोन पंपिंग स्टेशनचे काम सुरू२६ जुलै २००५ रोजी मिठी नदीने मुंबईला मगरमिठीत घेतले होते. तसेच ओशिवरा, दहिसर या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पश्चिम उपनगरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत नदी व नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण, नद्यांमधील गाळ काढणे, तसेच त्यांना पुनर्जीवित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला.मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी पर्जन्यवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मिलिमीटर एवढी वाढवण्यात येत आहे. तसेच सहा ठिकाणी पंपिंग स्टेशन बांधले असून आणखी दोन पंपिंग स्टेशनचे काम सुरू आहे.

टॅग्स :मुंबईनदीपाऊस