- अजय परचुरेमुंबई : मुंबई मेट्रो-१ स्टोअर व्हॅल्यू पासवर इन्स्टंट कॅशबॅक योजना १ फेबु्रवारीपासून सुरू करत आहे. प्रवाशांनी २०० ते ६०० रुपयांदरम्यान रिचार्ज केल्यास त्यांना २ टक्के ते १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.मुंबई मेट्रो-१मध्ये किमान भाड्यासाठी तीन पद्धतीने तिकीट यंत्रणा सध्या सुरू आहे. स्टोअर व्हॅल्यू पास (एस.व्ही.पी), रिटर्न जर्नी टोकन (आर.जे.टी.) आणि मंथली ट्रीप पास (एम.टी.पी.) हे प्रकार प्रवाशांची गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आले आहेत. तिकिटांच्या प्रकारामध्ये एस.व्ही.पी. या प्रकाराला प्रवाशांची सर्वाधिक मागणी असते. सध्या मुंबई मेट्रो-१च्या एकूण प्रवाशांपैकी १/३ प्रवासी एस.व्ही.पी.चा वापर करतात. या प्रकारात गेल्या वर्षात ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची निवड लक्षात घेऊन एस.व्ही.पी.चा जास्तीतजास्त लाभ घेण्यासाठी ही कॅशबॅक योजना सुरू करण्यात येत आहे.आजवर मेट्रो-१च्या प्रवाशांना त्यांनी केलेल्या प्रवासानुसार ० ते ५ रुपयांदरम्यानचा अधिकचा लाभ मिळत होता. आता त्यांना रिचार्जवर इन्स्टंट कॅशबॅक मिळेल. दैनंदिन रांगेतून प्रवाशांची संख्या कमी व्हावी, हा या योजनेमागचा उद्देश आहे. यामुळे प्रवाशांना पूर्वीच्या तुलनेत मेट्रो पकडण्यासाठी ४० टक्के कमी वेळ लागेल. मुंबई मेट्रो-१कडून ३१ जानेवारी, २०१९ पर्यंत असलेल्या शिल्लक रकमेवर १० टक्के थेट कॅशबॅक मिळेल. त्यामुळे स्टोअर व्हॅल्यू धारकांना लाभ मिळतानाच त्यांच्या सध्याच्या बॅलन्सचा वापर प्रवासासाठी करता येईल. एकेरी प्रवासासाठी १० ते ४० रुपये हे किमान भाडे कायम ठेवण्यात आले आहे. १०० रुपयांच्या रिचार्जवर कॅशबॅक मिळणार नाही.नव्या योजनेचे फायदेकमी अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधी अधिकचे लाभ मिळत नव्हते. आता सर्वच प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येईल.मेट्रोतून प्रवास करताना प्रवाशांना कॅशबॅकद्वारे किती रक्कम मिळाली हे कळेल.प्रवाशांना मिळणारा कॅशबॅक हा त्यांच्या ट्रॅव्हल बॅलन्स एवढाच असेल, ज्याचा ते प्रवासासाठी पूर्ण वापर करू शकतात.कॅशबॅकच्या वापरासाठी दीर्घकालीन वैधता असेल, ज्याचे प्रत्येक रिचार्जनंतर नूतनीकरण करण्यात येईल.अंतर नवे मूल्य टोकन मूल्य मूल्य/फेरी लाभ२-५ किमी ७७५ २० १७.२२ १४%५-८ किमी १,१०० ३० २४.४४ १९%८+ किमी १,३७५ ४० ३०.५६ २४%स्टोअर व्हॅल्यू पासचा प्रस्तावित कॅशबॅकरिजार्च रक्कम (रुपयांत) कॅशबॅक (%) २०० २% ३०० ४% ४०० ६% ५०० ८% ६०० व त्याहून अधिक १०%
मुंबई मेट्रो १ कडून प्रवाशांसाठी इन्स्टंट कॅशबॅक योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 1:15 AM