आठ हजार ग्राहकांना झटपट नवी वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2023 02:05 PM2023-08-05T14:05:45+5:302023-08-05T14:07:26+5:30

ग्रामीण भागात ६१६ ग्राहकांना अर्ज केल्यानंतर तातडीने शुल्क भरल्यामुळे ४८ तासांत कनेक्शन मिळाले तर ३१६२ ग्राहकांना आपल्या सोयीने शुल्क भरल्यानंतर ४८ तासांत वीजजोडणी मिळाली आहे. 

Instant new electricity connection to eight thousand customers | आठ हजार ग्राहकांना झटपट नवी वीजजोडणी

आठ हजार ग्राहकांना झटपट नवी वीजजोडणी

googlenewsNext

मुंबई : जुलै महिन्यात ८ हजार ६३ ग्राहकांना झटपट वीज कनेक्शन मिळाले असून, अर्ज केल्याच्या दिवशीच कनेक्शन मिळालेल्या ग्राहकांची संख्या ५१० आहे. तर ३ हजार ७७५ ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर २४ तासांत कनेक्शन मिळाले. ग्रामीण भागात ६१६ ग्राहकांना अर्ज केल्यानंतर तातडीने शुल्क भरल्यामुळे ४८ तासांत कनेक्शन मिळाले तर ३१६२ ग्राहकांना आपल्या सोयीने शुल्क भरल्यानंतर ४८ तासांत वीजजोडणी मिळाली आहे. 

ग्राहकांनी नव्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती दिली जाते. त्यानुसार शहरी भागातील ज्या ग्राहकांनी शुल्क भरले, त्यांना २४ तासांत कनेक्शन देण्यात आले, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

शहरी भागात २४ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज कनेक्शन मोहीम ग्रामीण भागासाठी अंतर व इतर अडचणी लक्षात घेऊन ४८ तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला. 

कृषी ग्राहकांना वीज कनेक्शन देणे हे अवघड असते. शेतामध्ये दूरवर असलेल्या विहिरीवरील कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यासाठी विजेचा खांब, वायर, ट्रान्सफॉर्मर अशा पायाभूत सुविधा अनेकदा उभाराव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना जोडणी मिळण्यास विलंब लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी वर्षभरात मोहीम राबविली. त्यातून निर्माण झालेल्या सुविधांमुळे कृषी पंपांसाठी कनेक्शन देण्याचा वेग वाढला आहे. 
- लोकेश चंद्र, अध्यक्ष, महावितरण 

- जून महिन्यात महावितरणने दहा दिवसात १ लाख नवीन घरगुती वीज कनेक्शन दिली. आता नव्या कनेक्शनसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात २४ तासांत तर ग्रामीण भागात ४८ तासांत वीज कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. 

१२२७ शेतकऱ्यांना जुलै महिन्यात झटपट वीज कनेक्शन मिळाली.
७४ शेतकऱ्यांना अर्ज केल्याच्या दिवशीच कनेक्शन मिळाले.
४९३ शेतकऱ्यांना शुल्क भरल्यानंतर २४ तासात कनेक्शन मिळाले.
५४३ शेतकऱ्यांना शुल्क भरल्यानंतर ४८ तासात कनेक्शन मिळाले.
अर्ज केल्यानंतर ४८ तासांत कनेक्शन मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ११७ आहे.
 

Web Title: Instant new electricity connection to eight thousand customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.