मुंबई : विकासाच्या माध्यमातून वरळी विभाग रोल मॉडेल करण्याचा निर्धार पर्यटनमंत्री व या मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मात्र सर्वाधिक रुग्ण आढळून आल्यामुळे वरळी आज कोरोनाचे केंद्र बनले आहे. वरळीच नव्हे तर कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने धारावी, भायखळा, ग्रँट रोड, गिरगाव, गोवंडी, वांद्रे हे परिसर ‘हॉट स्पॉट’ बनले आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मुंबईत आढळून आला. सुरुवातीला परदेश दौरा करून आलेल्या काही उच्चभ्रू वस्तींमधील नागरिकांना या आजाराची लागण झाल्याचे दिसून येत होते. दाटीवाटीने वसलेल्या मुंबईतील झोपडपट्ट्यांकडे सुरुवातीच्या टप्प्यात दुर्लक्ष झाल्याचे परिणाम वरळी भागात दिसून येत आहेत. या परिसरातील कोरोनाबाधित ३७ जणांमुळे २३० नागरिकांना संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या अहवालातून उजेडात आली आहे. तर भायखळा, नागपाडा, आग्रीपाडा या परिसरात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.या विभागाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ई विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना गेल्या आठवड्यात तडकाफडकी बदलण्यात आले. ही कारवाई होईपर्यंत या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेने आता निकष बदलून ८५ पेक्षा अधिक रुग्ण सापडल्यास तो विभाग हॉट स्पॉट ठरविला आहे. अंधेरी(के पश्चिम), धारावी(जी उत्तर), कुर्ला (एल) या विभागांमध्ये ८० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. पालिकेच्या या निकषाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाºयावर...सफाई कामगार-आया, डॉक्टर, परिचारिका अशा वैद्यकीय शाखेतील कर्मचाºयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शंभरहून अधिक प्रकरणे मुंबईत आहेत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दररोज एक हजार स्वसंरक्षण किटची गरज असते. मात्र नायर, केईएम, जोगेश्वरी ट्रॉमा, कस्तुरबा रुग्णालयांत पीपीई (स्वसंरक्षण) किट्स व एन ९५ मास्कचा तुटवडा आहे. तीन पाळ्यांत काम करणारे हे कर्मचारी ड्युटीनंतर घरी जात असल्याने कुटुंबालाही संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णालयातील कर्मचाºयांनी आंदोलन करूनही पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत, अशी तक्रार काही कर्मचाºयांनी केली. पालिका रुग्णालयांमधील अस्वच्छता हा दुसरा गंभीर विषय बनला आहे.रुग्णालयांवर नियंत्रण नाही...कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यावर पालिकेने खासगी रुग्णालयांची मदत घेतली.त्यांच्या मनमानी कारभारावर वचक नसल्याचे दिसून येत आहे.हे आहेत हॉट स्पॉट...जी दक्षिण - वरळी, प्रभादेवी, लोअर परळ 308इ - भायखळा, नागपाडा 125डी - ग्रँट रोड, नाना चौक, गिरगाव 107एम पूर्व - गोवंडी, मानखुर्द 86एच पूर्व - वांद्रे पूर्व, खार आणि सांताक्रुझ पूर्व 85