Join us

‘पद्मावती’ऐवजी ‘पद्मावत’ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 7:30 AM

केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाने (सीबीएफसी) संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटास यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे यासह एकूण पाच सुधारणा बोर्डाने सुचविल्या आहेत.

 मुंबई - केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाने (सीबीएफसी) संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटास यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे यासह एकूण पाच सुधारणा बोर्डाने सुचविल्या आहेत. हे बदल भन्साळी यांनी मान्य केले आहेत.सीबीएफसीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, २८ डिसेंबर रोजी बोर्डाच्या परीक्षण समितीची बैठक झाली. चित्रपटात काही बदल सुचवून यूए प्रमाणपत्रदेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आपला चित्रपट मलिक मुहंमद जायसी याच्या पद्मावत या काव्यावर आधारित असल्याचे भन्साळी यांनी संसदीय समितीसमोर सांगितले होते.राजपूत समुदायाच्या आक्षेपानंतर भन्साळी यांचा १५० कोटींचा हा चित्रपट वादात सापडला होता. चित्रपटाविरुद्ध उग्र निदर्शने करण्यात आली होती.सूचवलेले बदल चित्रपटाचे नाव ‘पद्मावत’ करा. ‘हा चित्रपट सती प्रथेचे उदात्तीकरण करीत नाही,’ अशी सूचना चित्रपटाच्या दाखवा.‘घुमर’ या गाण्यात बदल करा. ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भांमध्ये योग्य बदल करा. चित्रपटाचा ऐतिहासिक घडामोडींची पूर्णपणे संबंध नाही, अशी सूचना चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवा.

टॅग्स :पद्मावती