बीसीआयला नफ्याचा काही भाग कोरोना रुग्णांसाठी खर्च करण्याचे निर्देश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:09 AM2021-05-05T04:09:47+5:302021-05-05T04:09:47+5:30

उच्च न्यायालयात जनहित याचिका बीसीआयला नफ्याचा काही भाग कोरोना रुग्णांसाठी खर्च करण्याचे निर्देश द्या उच्च न्यायालयात जनहित याचिका लोकमत ...

Instruct the BCI to spend a portion of the profits on corona patients | बीसीआयला नफ्याचा काही भाग कोरोना रुग्णांसाठी खर्च करण्याचे निर्देश द्या

बीसीआयला नफ्याचा काही भाग कोरोना रुग्णांसाठी खर्च करण्याचे निर्देश द्या

Next

उच्च न्यायालयात जनहित याचिका

बीसीआयला नफ्याचा काही भाग कोरोना रुग्णांसाठी खर्च करण्याचे निर्देश द्या

उच्च न्यायालयात जनहित याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) सामने रद्द करावे किंवा पुढे ढकलण्याचे आदेश बीसीसीआयला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेल्या वंदना शहा यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच नुकसानभरपाई म्हणून बीसीसीआयला १००० कोटी रुपये भरण्याचे व त्यांच्या नफ्यातील काही भाग कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी खर्च करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

बीसीसीआयने आयपीएलचे सर्व सामने मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतल्यावर वंदना शहा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर तत्काळ सुनावणी घ्यावी, अशी विनंती शहा यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला केली.

बायो-बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सामने मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आधीच कोरोनाचा कहर वाढला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ६ मे रोजी ठेवली आहे.

.........................

Web Title: Instruct the BCI to spend a portion of the profits on corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.