मुंबई : कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने विविध भागांतील स्मशानभूमींवर ताण वाढत आहे. विशेषत: शिवाजी पार्क व चंदनवाडी स्मशानभूमी सरकारी व महापालिका रुग्णालयांच्या जवळपास असल्याने यावरील ताण अधिक वाढला आहे. या ठिकाणील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करावी व त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.या दोन्ही स्मशानभूमींजवळ राहणाºया नागरिकांना त्याचा त्रास होत आहे व त्यांच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. राज्य सरकार जागतिक आरोग्य संघटना व आयसीएमआरच्या नियमांचे पालन करत नाही. रुग्णांचे शव ‘लिक प्रूफ बॅगे’मध्ये नीट गुंडाळून देत नाहीत. तसेच मृत रुग्णावर अंतिम संस्कार करणाºया स्मशानभूमीतील कर्मचाºयांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शवाला १ टक्के हायपोक्लोरिन लावत नाहीत.राज्य सरकारला सर्व नियमांचे पालन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी अॅड. अपर्णा वटकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयने या याचिकेत मुंबई महापालिकेला प्रतिवादी करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले आहेत.स्मशानभूमीतील कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने सरकारला भर्ती करण्याचे आदेश द्यावेत व त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.>स्थानिकांच्या जीवाला धोकास्मशानभूमीतील कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने सरकारला भर्ती करण्याचे आदेश द्यावेत व त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या समस्येबाबत रहिवाशांनी मूक आंदोलन केले.
CoronaVirus News : स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश द्या, उच्च न्यायालयात जनहित याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 1:46 AM