वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याचे निर्देश, तब्बल १०६८.९ कोटींची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 12:44 PM2021-03-13T12:44:04+5:302021-03-13T12:50:30+5:30

Mumbai Electricity News : महावितरणच्या भांडूप परिमंडलात उच्चदाबातील ग्राहकांकडे रु २८७.६ कोटी ची थकबाकी आहे.

Instructions to disconnect customers who have not paid their electricity bills | वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याचे निर्देश, तब्बल १०६८.९ कोटींची थकबाकी

वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याचे निर्देश, तब्बल १०६८.९ कोटींची थकबाकी

Next

मुंबई : भांडूप परिमंडलातील उच्चदाब व लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट तसेच सार्वजनिक विभागाकडे वीज बिलाची थकबाकी रु १०६८.९ कोटी रुपयांची आहे. कोरोना काळातील थकबाकीमुळे हा आकडा वाढला असून, वसुलीची धडक मोहीम परिमंडल अंतर्गत सुरू करण्यात आली आहे.

भांडूप पारीमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या निर्देशानुसार ज्या ग्राहकांनी वीज बिल भरले नाहीत, त्यांची वीज जोडणी तोडण्याचे आदेश दिले आहेत.  त्याप्रमाणे, आता वीज जोडणी तोडण्याचे काम निर्विवादपणे सुरू केली आहे.

महावितरणच्या भांडूप परिमंडलात उच्चदाबातील ग्राहकांकडे रु २८७.६ कोटी ची थकबाकी आहे. ज्यामध्ये घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक,  ग्राहकांकडे रु. २५७.८५ कोटी, इतर ग्राहकांकडे रु. २५.२९ कोटी, पाणीपुरवठा योजनांकडे रु. ४.४६ कोटी, कृषी ग्राहकांकडे रु. ०.०१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

लघुदाबातील ग्राहकांकडे रु ७८१.३ कोटीची थकबाकी आहे. ज्यामध्ये घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांकडे रु. ५६२.९३ कोटी, इतर ग्राहकांकडे रु. १५.४२  कोटी, पाणीपुरवठा योजनांकडे रु. ८.६८ कोटी,  स्ट्रीट लाईट रु.१८९.६६ कोटी, कृषी ग्राहकांकडे रु ४.६१ कोटी रुपयांची असे उच्चदाब व लघुदाब मिळून एकूण १०६८.९ कोटीची थकबाकी भांडूप परिमंडलात आहे.

महावितरणची आर्थिक स्थिती बिकट आहे. महावितरणची घरगुती ग्राहकांची एकूण थकबाकी ७१ हजार ५०६ कोटी रुपयांवर आली असून महावितरणवर ४६ हजार ६५९ कोटी रुपयांचे कर्जही आहे. म्हणून वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, १२ मार्च २०२१ पासून पुन्हा वीज जोडणी तोडण्याचे काम सुरु झाले आहेत.

मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी वीज जोडणीची तोडणी होऊ नये म्हणून वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित होण्याची गैरसोय टाळावी अशी विनंती ग्राहकांना केली. वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई अजून तीव्र करण्यात आली आहे.

Web Title: Instructions to disconnect customers who have not paid their electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.