डीपीच्या सूचनांमध्ये पुण्याचीच आघाडी

By admin | Published: April 25, 2015 04:53 AM2015-04-25T04:53:52+5:302015-04-25T04:53:52+5:30

मुंबईच्या विकास नियोजन आराखडा २०३४ विरोधात मुंबई महापालिकेत मुंबईतून सूचना व हरकतींचा पाऊस पडेल, असे वाटले होते.

In the instructions of the DP, the lead of the priest | डीपीच्या सूचनांमध्ये पुण्याचीच आघाडी

डीपीच्या सूचनांमध्ये पुण्याचीच आघाडी

Next

मुंबई : मुंबईच्या विकास नियोजन आराखडा २०३४ विरोधात मुंबई महापालिकेत मुंबईतून सूचना व हरकतींचा पाऊस पडेल, असे वाटले होते. पण यातही पुणेच अव्वल ठरले आहे. अवघी ३१ लाख लोकसंख्या असलेल्या पुण्यात ८७ हजार लोकांनी पुण्याच्या विकास आराखड्यावर हरकती घेऊन जागरुकता दाखविली होती. त्या तुलनेत मुंबईने आज अखेरच्या दिवशी अवघा ५० हजारांचा आकडा गाठला़ यातही एकाच त्रुटीबाबत हजारो हरकती पाठविणाऱ्यांची संख्या अधिक आहे़
मुंबई शहराचे पुढील वर्षाकरीता नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आलेला २०१४-२०३४ चा आराखडा नुकताच मुख्यमंत्र्यांनी रद्द ठरविला़
या आराखड्यातील त्रुटींमध्ये
सुधारणा करुन चार महिन्यांत नव्याने हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत़ मात्र वादग्रस्त ठरलेल्या या आराखड्यावर आज अखेरच्या दिनापर्यंत सुमारे ५० हजार हरकती व सूचना पालिका दप्तरी दाखल झाल्या़ हा आकडा मोठा असल्याने पालिका चार महिन्यांत सुधारित आराखडा कसा आणणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र पुणे शहराच्या नियोजन आराखडा २०१३ मध्ये ८७ हजार हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या़ (प्रतिनिधी)

Web Title: In the instructions of the DP, the lead of the priest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.