मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी दिले. कांजूरमार्ग येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि कचरा क्षेपणी भूमीला भेट देऊन त्यांनी पाहणी केली. कचऱ्यावर केली जाणारी प्रक्रिया तसेच अन्य कामांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संजोग कबरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
१) कांजूर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये रोज सुमारे ४५०० दशलक्ष टन नागरी घनकचरा गोळा केला जातो.
२) या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने बायोरिॲक्टर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रक्रिया केली जाते. घनकचऱ्यांतून खत निर्मितीची प्रक्रियासुद्धा केली जाते. आयुक्तांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली.
३) यावेळी त्यांच्या आणि डॉ. शिंदे यांच्या हस्ते प्रकल्प परिसरात वृक्षारोपणदेखील करण्यात आले. पालिकेच्यावतीने कोकाकोला कंपनी आणि कचरा वेचक संघात भागीदारी केली जाणार सांगण्यात आले.