पॉझिटिव्हिटी दर जास्त असलेल्या जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 06:21 PM2021-08-05T18:21:53+5:302021-08-05T18:25:01+5:30
चार जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, जास्तीचे लसीकरण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Next
मुंबई : राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. या चारही जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी यंत्रणेला आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
या चारही जिल्ह्यांत सध्या कोरोना रुग्णसंख्या जास्त आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेमार्फत ट्रॅकिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर अधिक भर दिला जात आहे. या चार जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, जास्तीचे लसीकरण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.