मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दुस:या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील लाखो शिवसैनिक आणि नागरिक शिवाजी पार्कात दाखल होत असतात. त्या वेळी गैरसोय होऊ नये, म्हणून शिवाजी पार्कवर सर्व अत्यावशक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
महापौर स्नेहल आंबेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या दुस:या स्मृतिदिनानिमित्त पूर्व तयारीसंदर्भात पालिका पदाधिका:यांसह अधिका:यांची संयुक्त सभा महापौर निवास येथे घेऊन तेथील कामाचा आढावा घेतला.
महापौरांनी प्रशासनाला या वेळी असे निर्देश दिले की, 17 नोव्हेंबरला राज्यभरातून नागरिक या स्मृतिस्थळाला भेट देत असतात. या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा तसेच अन्य अत्यावश्यक बाबी पुरविण्यात याव्यात. या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी. स्मृतिस्थळावर होणा:या संभाव्य गर्दीच्या अनुषंगाने बॅरिकेड्स लावावेत, चार पाण्याचे टँकर तसेच महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेसाठी या दिवशी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचेही निर्देश त्यांनी दिले. सध्या डेंग्यू व मलेरियाची साथ राज्यात पसरलेली आहे. स्मृतिस्थळावर येणा:या नागरिकांची संख्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी अॅम्ब्युलन्स व आरोग्य केंद्र उभारण्यात यावे. तसेच 15 नोव्हेंबर 2क्14 पासून शिवाजी पार्क परिसरात धूरफवारणी करण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आणि वाहतुकीच्या दृष्टीने महापौर संबंधित अधिका:यांसमवेत स्वतंत्र बैठक घेणार आहेत. (प्रतिनिधी)