Join us

नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावा, महापौरांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 2:41 AM

पी/उत्तर व आर /दक्षिण विभाग कार्यालयांतर्गत संबंधित विभागातील नागरिकांनी मांडलेल्या नागरी समस्यांचा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी विभाग कार्यालयात उपस्थित राहून आढावा घेतला

मुंबई : पी/उत्तर व आर /दक्षिण विभाग कार्यालयांतर्गत संबंधित विभागातील नागरिकांनी मांडलेल्या नागरी समस्यांचा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी विभाग कार्यालयात उपस्थित राहून आढावा घेतला, तसेच या समस्या तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित सहायक आयुक्त यांना दिले.पी/उत्तर विभागातील नागरी समस्यांमध्ये गावकरी पुजारी तलावामधील कारंजांची पुन्हा दुरुस्ती करणे, राजे शहाजी राजे क्रीडांगणाच्या विरुद्ध दिशेने असलेले, तसेच नागरिकांच्या गैरसोयीच्या दृष्टीने असलेले सुलभ शौचालय इतरत्र हलविणे, मुंबई टॉकिज परिसरात असलेली विहीर पुन्हा सुरू करणे, डी माँटेज मार्गावरील अतिक्रमण काढून या मार्गावर पर्जन्य जलवाहिनी टाकणे, मालवणी मार्गावरील खड्डे बुजविणे, कोळीवाड्यातील घरांचे नूतनीकरण करण्याची परवानगी देणे, सोमवार बाजारातील अनधिकृत गाड्यांवर कारवाई करणे, शिवाजी कॉम्प्लेक्समधील गटाराची साफसफाई करणे आदी समस्यांचा पाढा नागरिकांनी या वेळी महापौरांसमोर मांडला. खजुराह टँक मार्गावरील बंद असलेले म्युझिक उद्यान पुन्हा सुरू करणे, ९० फूट रोडवरील लालजीपाडा परिसरातील बंद असलेला रस्ता पुन्हा सुरू करणे, बाणडोंगरी पोलीस रिक्षा स्टँडजवळील कचरा तातडीने उचलण्यात येणे, सह्याद्रीनगर माथाडी कामगार वसाहतीमध्ये दुर्गंधयुक्त पाण्याची विल्हेवाट लावणे, अशोकनगर विभागातील विहिरींची साफसफाई करणे, ९० फूट मार्गावरील अतिक्रमणधारकांवर तातडीने कारवाई करणे, सोलापूर मित्रमंडळाच्या बंद असलेल्या पाणपोईच्या जागी समाजसेवा केंद्र सुरू करणे, बंदरपाखाडी भागातील नाल्यावर संरक्षक भिंत बांधणे, पोईसरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावणे आदी समस्यांचा पाढा नागरिकांनी महापौरांसमोर मांडला.सहायक आयुक्त संजय कुºहाडे यांनी याची नोंद घेऊन ज्या समस्या तत्काळ निघाली निघणे शक्य आहे, त्या तातडीने सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे, तसेच उर्वरित समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना या समस्या तातडीने हाती घेण्याचे निर्देश देणार असल्याचे सांगितले.>मूलभूत प्रश्न आधी सोडवण्याची मागणीपी उत्तर विभागातील अधिकाºयांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अधिकाºयांनी दिले़ मात्र केवळ आश्वासन नको तर मूलभूत सेवा सुविधा तातडीने मिळायला हव्यात व अनधिकृत वाहनांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली़ मुंबई टॉकीज परिसरातील विहीर पुन्हा सुरू करावे, असे नागरिकांचे म्हणणे होते़ महापौर हे प्रश्न मार्गी लावण्यात आदेश अधिकाºयांना दिले़