कोरोनासाठी तुरुंग प्रशासनाला सज्जतेचे निर्देश - अनिल देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 06:09 AM2020-03-18T06:09:59+5:302020-03-18T06:10:13+5:30

नव्याने भरती होणा-या कैद्यांना आवश्यकता असल्यास इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात यावे. आधीपासून तुरुंगात असलेल्या सर्व कैद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी.

Instructions for Prison Administration to Ready for Prevent Corona - Anil Deshmukh | कोरोनासाठी तुरुंग प्रशासनाला सज्जतेचे निर्देश - अनिल देशमुख

कोरोनासाठी तुरुंग प्रशासनाला सज्जतेचे निर्देश - अनिल देशमुख

Next

मुंबई : कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगात नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक कैद्याचे स्क्रीनिंग करण्यात यावे. नव्याने भरती होणा-या कैद्यांना आवश्यकता असल्यास इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात यावे. आधीपासून तुरुंगात असलेल्या सर्व कैद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. क्षमतेपेक्षा जास्त बंदी असलेल्या कारागृहांतून बंद्यांना अन्य कारागृहांत हलविण्यात यावे, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक गृहमंत्र्यांनी घेतली. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय कुमार, श्रीकांत सिंह, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस महासंचालक (सुधारसेवा) सुरेंद्र पांडे, प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (सुधारसेवा) दीपक पांडे उपस्थित होते़
गृहमंत्री देशमुख म्हणाले, कारागृहातील बंद्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. नव्याने घडणाºया गुन्ह्यातील बंदी कारागृहात दाखल होतात. अमलीपदार्थांच्या विक्रीसारख्या गुन्ह्यात काही वेळा विदेशी मूळ असलेले बंदीही नव्याने कारागृहात दाखल होतात. त्या माध्यमातून अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून नवीन दाखल होणाºया प्रत्येक कैद्याची प्राथमिक तपासणी करून स्क्रीनिंग करण्यात यावे. आवश्यकता असल्यास त्यांना अन्य कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात यावे. सर्दी, फ्ल्यूसारखे आजार असलेल्या बंद्यांना इतरांपासून वेगळे करण्यासाठी वेगळा वॉर्ड ठेवण्यात यावा.
मुंबईत नव्याने दाखल होणाºया गुन्ह्यातील कैद्यांना थेट तळोजा कारागृहातच भरती करावे, असेही निर्देश त्यांनी अधिकाºयांना दिले.

Web Title: Instructions for Prison Administration to Ready for Prevent Corona - Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.