Join us

उद्योगविकासासाठी पालिकेने मागवल्या सूचना

By admin | Published: July 01, 2015 1:06 AM

मुंबईत उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या खासगी कक्षातील अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर पालिका प्रशासनाने आता आपल्याच सर्व खात्यांतील

मुंबई : मुंबईत उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या खासगी कक्षातील अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर पालिका प्रशासनाने आता आपल्याच सर्व खात्यांतील अधिकाऱ्यांना अभिनव कल्पना सुचविण्याचे आवाहन केले आहे़ उद्योगधंद्यांबरोबरच नागरिकांशी निगडित सेवा-सुविधांची प्रक्रियाही सुटसुटीत कशा करता येतील, याबाबत सूचना मागविल्या आहेत़मुंबईतून हद्दपार होत असलेल्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी विविध परवाने व आवश्यक परवानगीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यास पालिकेने पुढाकार घेतला आहे़ यासाठी बिझनेस डेव्हलपमेंट सेलची स्थापना करण्यात आली आहे़ मात्र या विशेष कक्षामध्ये काम करणाऱ्या खासगी तज्ज्ञांच्या संथ प्रगतीवर आयुक्त अजय मेहता नाराज होते़ त्यामुळे गेल्याच महिन्यात हा कक्ष बंद करून आपल्याच अधिकाऱ्यांना संधी देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला़मुंबईत नवीन उद्योग सुरू करण्यासाठी पालिकेच्याच ३० विविध विभागांकडून परवानगी घ्यावी लागत असते़ मात्र यापैकी अनेक विभागांमध्ये परवानगीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे समानच असतात़ त्यामुळे या किचकट प्रक्रियेत वेळ न दवडता उद्योजकांना लवकरात लवकर विविध परवाने मिळवून देण्यावर या कक्षातील पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आयुक्तांनी सूचना मागविल्या आहेत़ (प्रतिनिधी)