‘सर्जिकल स्ट्राइक’ साजरा करण्याचे विद्यापीठांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 06:01 AM2018-09-21T06:01:31+5:302018-09-21T06:01:41+5:30

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ म्हणून पाळण्याचे आदेश दिले आहेत.

Instructions to Universities to Celebrate 'Surgical Strike' | ‘सर्जिकल स्ट्राइक’ साजरा करण्याचे विद्यापीठांना निर्देश

‘सर्जिकल स्ट्राइक’ साजरा करण्याचे विद्यापीठांना निर्देश

googlenewsNext

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ म्हणून पाळण्याचे आदेश दिले आहेत. या दिवशी सशस्त्र दलांतील जवानांच्या बलिदानाबाबत माजी सैनिकांचे संवाद सत्र, विशेष परेड, प्रदर्शनांचे आयोजन तसेच सशस्त्र दलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शुभेच्छापत्रे पाठविण्यात यावीत, असेही यूजीसीने आपल्या आदेशात म्हटले आहे.
२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ले करीत सर्जिकल स्ट्राइक केले होते. विशेष दलाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीच्या तयारीतील दहशतवाद्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते.
त्यासंदर्भातील व्हिडीओही काही महिन्यांपूर्वी जारी करण्यात आला होता. यामुळे दहशतवाद्यांच्या मनात भारत आणि भारतीय जवानांबाबत चांगलीच दहशत निर्माण झाली होती. दहशतवादी कारवाईचा बिमोड करत त्यांच्या मनात जरब बसवणाऱ्या सर्जिकल स्ट्राइकचे देशभरात कौतक झाले. भारतीय जवानांच्या या यशाची आठवण म्हणून विद्यापीठांत हा दिवस साजरा करण्याच्या सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.
>प्रदर्शने भरवण्याची सूचना
यूजीसीने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना बुधवारी पत्र पाठविले असून यात सर्व विद्यापीठांतील एनसीसीच्या कॅडेट्सना २९ सप्टेंबर रोजी विशेष परेड घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. परेडनंतर एनसीसीचे कमांडर सीमेच्या संरक्षणासंबंधी या कॅडेट्सना संबोधित करतील, असेही त्यात नमूद केले आहे. यूजीसीच्या पत्रात म्हटले आहे की, दिल्लीतील राजपथावरील इंडिया गेटजवळ २९ सप्टेंबर रोजी एका दृकश्राव्य प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येईल. याच धर्तीवर राज्ये, केंद्रशासित प्रदेश, महत्त्वाची शहरे, देशातील लष्करी छावण्यांमध्येही प्रदर्शने भरवली जातील. ही प्रदर्शने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारी असावीत, असेही या पत्रात नमूद आहे.

Web Title: Instructions to Universities to Celebrate 'Surgical Strike'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.