Join us  

विमा कंपनीला दंड

By admin | Published: October 14, 2014 12:47 AM

वाहन चोरीचा विमा दावा तांत्रिक कारणास्तव नाकारणा:या रिलायन्स जनरल इन्शुअरन्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दाव्याची रक्कम आणि 2 लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणो : वाहन चोरीचा विमा दावा तांत्रिक कारणास्तव नाकारणा:या रिलायन्स जनरल इन्शुअरन्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दाव्याची रक्कम आणि 2 लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
कळवा येथील गोविंद मंडाले यांनी रिलायन्स जनरल इन्शुअरन्सच्या ठाणो शाखेकडून शेव्हरले टॅवेरा या वाहनासाठी 6 लाखाचे विमा संरक्षण 27 ऑक्टोबर 2क्क्9 ते 26 ऑक्टोबर 2क्1क् या कालावधीसाठी घेतले होते. या दरम्यान कळवा येथे रस्त्यावर पार्क केलेली ही गाडी 28 ऑक्टोबर 2क्क्9ला रात्री चोरीला गेली. यासंदर्भात मंडाले यांनी कळवा पोलीस ठाण्यात 29 ऑक्टोबरला तक्रार केली. परंतु वाहन सापडल्याबाबत कोणतीही सूचना न मिळाल्याने त्यांनी वाहन चोरीचा विमा दावा इन्शुअरन्स कंपनीकडे पाठविला. तर चोरी झाल्यावर 9 दिवस उशिराने दावा केल्याचे कारण देवून विमा कंपनीने तो नाकारला. मंडाले यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. तर विमा संरक्षण घेताना तपासणीसाठी आणलेले वाहन वेगळे आणि चोरीला गेलेले वाहन वेगळे आहे,असेही विमा कंपनीने सांगितले.कागदपत्रे, घटनांची पडताळणी केली असता पॉलिसी याच शेव्हरले टॅवेरा याच गाडीची असून दुसरे वाहन तपासणीसाठी आणल्याचा पुरावा विमा कंपनीने दिला नाही, हे मंचाने स्पष्ट केले. तसेच वाहन चोरी झाले त्यादिवशी विमा संरक्षण वैध होते.(प्रतिनिधी)