रेल्वेच्या ३१,४६६ कर्मचाऱ्यांना विमा कवच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:19 PM2023-11-10T12:19:45+5:302023-11-10T12:19:57+5:30
समूह मुदत विमा योजनेत कोणतीही वैद्यकीय तपासणी होणार नाही. मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यापासून १० दिवसांच्या आत दावा स्वीकारला जाईल आणि निकाली काढला जाईल.
मुंबई : समूह मुदत विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी मध्य रेल्वेमधील ३१ हजार ४६६ कर्मचाऱ्यांकरिता भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि सरकारी क्षेत्रात करार झाला.
ग्रुप टर्म इन्शुरन्स प्लॅन ही एक वार्षिक नूतनीकरण करण्यायोग्य समूह मुदत विमा योजना असून, टर्म इन्शुरन्स घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळणार आहे.
समूह मुदत विमा योजनेत कोणतीही वैद्यकीय तपासणी होणार नाही. मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यापासून १० दिवसांच्या आत दावा
स्वीकारला जाईल आणि निकाली काढला जाईल.
योजनेत वयोमर्यादा १८-६० वर्षे निश्चित आहे. योजनेत आत्महत्या प्रकरणांचाही समावेश केला जाईल.
प्रत्येक स्लॅबमधील सर्व वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीपर्यंत प्रीमिअम समान असेल.
योजनेत स्लॅब आणि इतर सुविधांनुसार कर्मचाऱ्यांच्या पगारातून मासिक प्रीमिअम कापला जाईल.