मेट्रोच्या प्रवाशांना विमा कवच; बरे वाईट झाले तर नुकसान भरपाई मिळणार!

By सचिन लुंगसे | Published: May 29, 2023 06:39 PM2023-05-29T18:39:32+5:302023-05-29T18:41:15+5:30

मेट्रो २ अ : दहिसर पूर्व ते डीएन. नगर, मेट्रो ७ : अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व

insurance cover for metro passengers if good or bad you will get compensation | मेट्रोच्या प्रवाशांना विमा कवच; बरे वाईट झाले तर नुकसान भरपाई मिळणार!

मेट्रोच्या प्रवाशांना विमा कवच; बरे वाईट झाले तर नुकसान भरपाई मिळणार!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मेट्रो प्रवाशांची प्रवासादरम्यान तसेच स्थानक परिसरात सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महा मुंबईमेट्रो संचलन महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मेट्रो मार्ग २ अ आणि ७ ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासी विमा कवच लागू करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व प्रवाशांना वार्षिक सर्वसमावेशक विमा पॉलिसी महा मुंबई मेट्रो मार्फत देण्यात येणार आहे.

किती मदत मिळणार

१) विमा योजनेनुसार अनपेक्षित घटनांमुळे दुर्घटनाग्रस्त प्रवासी रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला जास्तीत जास्त १ लाख तर बाह्यरुग्णांसाठी १० हजारापर्यंतची भरपाई मिळणार आहे.
२) बाह्यरुग्ण उपचार आणि रुग्णालयात दाखल असल्यास रुग्णालयातील संरक्षणा व्यतिरिक्त (बाह्यरुग्ण उपचार) खर्च कमाल १० हजारपर्यंत दिला जाणार आहे.
३) किरकोळ दुखापतीच्या भरपाईसह वैद्यकीय खर्चाअंतर्गत जास्तीत जास्त ९० हजार रुपये भरपाई देण्यात येणार आहे.
४) अपघातांदरम्यान प्रवाशांचा मृत्यु झाल्यास ५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद आहे.
५) कायमच किंवा आंशिक अपंगत्व आल्या ४ लाखांपर्यंत नुकसाईभरपाई या विम्याअंतर्गत मिळू शकेल.

१) ज्या प्रवाशांकडे वैध तिकीट/पास/स्मार्ट कार्ड/क्यूआर कोड/वैध परवानगी असेल अशा सर्व वैध प्रवाशांसाठी ही पॉलिसी लागू असेल.
२) पॉलिसी ही वैध प्रवासी हा मुंबई मेट्रो स्थानकाची इमारत, प्लॅटफॉर्म किंवा ट्रेनमध्ये किंवा स्थानक परिसरात जसे की सशुल्क आणि विनाशुल्क परिसर (कॉनकोर्स आणि फलाट )अशा सर्व ठिकाणी वैध असेल. 
३) मेट्रो स्टेशन इमारतीचे बाह्य क्षेत्र जसे की पार्किंग इत्यादी ठिकाणी काही अनिश्चित घटना/अपघात घडल्यास या विमा पॉलिसीचं सरक्षण त्या व्यक्तिला लागू होणार नाही. 

मेट्रोचा प्रवास हा सुरक्षित आहेच. पण सर्व सुरक्षा उपायांव्यतिरिक्त अनपेक्षित उद्भवलेल्या परिस्थितीत प्रवाशांचे जीवन सुरक्षित करणेही गरजेचे होते. म्हणून विमा संरक्षण प्रदान करत आहोत. हे विमा कवच लागू केल्यामुळे दुर्दैवी घटनेच्या बाबतीत पुरेसे विमा संरक्षण मिळणार आहे. - एस. व्ही. आर. श्रीनिवास, व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो

Web Title: insurance cover for metro passengers if good or bad you will get compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.