मुंबईकरांना विमा सुरक्षा द्याच
By admin | Published: January 13, 2016 02:09 AM2016-01-13T02:09:39+5:302016-01-13T02:09:39+5:30
मुंबईतील खड्डे, उघडी गटारे आणि पदपथांची दुरवस्था यामुळे मुंबईकरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना-भाजपाने आश्वासनाप्रमाणे आता मुंबईकरांना
मुंबई : मुंबईतील खड्डे, उघडी गटारे आणि पदपथांची दुरवस्था यामुळे मुंबईकरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना-भाजपाने आश्वासनाप्रमाणे आता मुंबईकरांना वीमा संरक्षण द्यावे, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. वांद्रे येथील मॅनहोलमध्ये पाय अडकून झालेल्या अपघाताबद्दल विजय हिंगोरानी या रहिवाशाने पालिकेकडे दीड कोटीच्या नुकसानभरपाईची मागणी केली, या पार्श्वभूमीवर अहिर बोलत होते.
हिंगोरानी यांनी नुकसानभरपाईसाठी दाखल केलेला दावा म्हणजे पालिकेच्या गचाळ कारभाराचा पुरावा आहे. एकीकडे स्मार्ट सिटीच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे महानगराला किमान नागरी सुविधांपासून वंचित ठेवायचे, असा कारभार सुरू आहे. एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यात व्यस्त असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची, याचाही खुलासा करावा, असे आव्हान अहिर यांनी दिले. (प्रतिनिधी)