रब्बीतही एक रुपयातच विमा; असा करता येईल विम्यासाठी अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 06:39 AM2023-11-04T06:39:56+5:302023-11-04T06:40:17+5:30

गेल्या वर्षी राज्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांनी घेतला होता लाभ

Insurance in Rabi too in one rupee; This can be done by applying for insurance | रब्बीतही एक रुपयातच विमा; असा करता येईल विम्यासाठी अर्ज 

रब्बीतही एक रुपयातच विमा; असा करता येईल विम्यासाठी अर्ज 

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयातच विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे. 
राज्यात गेल्या रब्बी हंगामात ७ लाख ४५ हजार ३१६ शेतकऱ्यांनी ५ लाख ३४ हजार ९४७ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता. त्यात २ हजार ३२ कोटी रुपयांची रक्कम विमा संरक्षित केली होती. शेतकऱ्यांच्या हिस्स्यापोटी ३३ कोटी रुपये जमा झाले होते. तर केंद्र व राज्य सरकारने प्रत्येकी सुमारे १२२ कोटी दिले होते. तर एकूण विमा हप्ता २७७ कोटी रुपयांचा होता. त्यापैकी ५० हजार ६७५ शेतकऱ्यांना १८ कोटी ९० लाख रुपयांची भरपाई देण्यात आली. 

असा करता येईल विम्यासाठी अर्ज 
nशेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे.  
nरब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत, तर गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी ३१ मार्चपर्यंत सहभागी होता येईल. वेबसाइटची लिंक -  http://pmfby.gov.in 

कोणत्या जिल्ह्यात कोणती विमा कंपनी?
nपुणे, हिंगोली, अकोला, धुळे व धाराशिव जिल्ह्यासाठी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे.  
nसातारा, नगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव जिल्ह्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. 

५३ हजार केळी उत्पादकांच्या खात्यावर ३७८ कोटी
जळगाव : केळी उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असून, आठवडाभरात जिल्ह्यातील ५३ हजार ९५१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३७८ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम पडणार आहे. हवामानावर आधारीत फळ पीक विम्याची रक्कम दर वर्षाला १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पडते. यावर्षी मात्र, विमा कंपनीने केळी उत्पादकांच्या केळी लागवड क्षेत्राच्या पडताळणीचा घाट घातल्यामुळे मुदत संपल्यावर देखील खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम पडलेली नव्हती. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील यांचा पाठपुरावा सुरु होता. 

Web Title: Insurance in Rabi too in one rupee; This can be done by applying for insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.