Join us

‘भारत बंद’च्या समर्थनार्थ मालाडमध्ये तीव्र निदर्शने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला समर्थन देण्यासाठी व कृषी कायद्यांना विरोध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला समर्थन देण्यासाठी व कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मालाड काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून निदर्शने केली.

यावेळी अस्लम शेख म्हणाले की, केंद्र सरकारने मंजूर केलेले हे तीन कायदे शेतकऱ्यांना स्वत:च्याच भूमीत मजूर बनवणारे आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किमान समर्थन मूल्य देणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्था संपविण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.

''करार शेती''चे आजवर जेवढे प्रयोग देश-विदेशात झाले, ते सर्व फसल्याची उदाहरणं ताजी असताना, पुन्हा नव्याने काही बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी ''करार शेतीचा'' घाट घातला जातो आहे. १९५५चा अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करून बड्या कंपन्यांना साठेबाजीसाठी केंद्र सरकारने रान मोकळं करून दिले, अशी टीका त्यांनी केली.

------------------------------