एसआरपी जवानांची आंतर जिल्हा बदलीची अट रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:06 AM2021-05-13T04:06:37+5:302021-05-13T04:06:37+5:30
गृहमंत्र्यांचा निर्णय; १५ ऐवजी १२ वर्षांनंतर घटक बदलीसाठी पात्र लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य राखीव पोलीस दलात ...
गृहमंत्र्यांचा निर्णय; १५ ऐवजी १२ वर्षांनंतर घटक बदलीसाठी पात्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या जवानांसाठी खुशखबर आहे. त्यांना आता आपल्या हव्या त्या पोलीस घटकामध्ये बदलीसाठी १५वर्षे सेवा करावी लागणार नाही.१२ वर्षांच्या सेवेनंतर ते आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरणार आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर नियुक्तीनंतर त्यांना मुख्यालयात ५ वर्षांची सेवा करण्याची अट रद्द करून दोन वर्षे इतकी करण्यात आली आहे.
एसआरपी जवानांकडून गेल्या काही वर्षांपासून यासाठी वारंवार मागणी होत होती. २००९ नंतर भरती झालेल्या जवानांना १५ वर्षे सेवा केल्यानंतर त्यांचा अर्ज आंतर जिल्हा बदलीसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंत्रालयात आज त्याबाबत झालेल्या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृह सचिव मनुकुमार श्रीवास्तव पोलीस महासंचालक संजय पांडे, एसआरपीच्या प्रमुख अर्चना त्यागी आदी उपस्थित होते.