एसआरपी जवानांची आंतरजिल्हा बदलीची अट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:06 AM2021-05-14T04:06:29+5:302021-05-14T04:06:29+5:30

१५ ऐवजी १२ वर्षांनंतर घटक बदलता येणार, गृहमंत्र्यांचा निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य राखीव पोलीस दलात ...

Inter-district transfer condition of SRP personnel canceled | एसआरपी जवानांची आंतरजिल्हा बदलीची अट रद्द

एसआरपी जवानांची आंतरजिल्हा बदलीची अट रद्द

Next

१५ ऐवजी १२ वर्षांनंतर घटक बदलता येणार, गृहमंत्र्यांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या जवानांसाठी खुशखबर आहे. त्यांना आता आपल्या हव्या त्या पोलीस घटकामध्ये बदलीसाठी १५ वर्षे सेवा करावी लागणार नाही. १२ वर्षांच्या सेवेनंतर ते आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरणार आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर नियुक्तीनंतर त्यांना मुख्यालयात ५ वर्षांची सेवा करण्याची अट रद्द करून दोन वर्षे इतकी करण्यात आली आहे.

एसआरपी जवानांकडून गेल्या काही वर्षांपासून या बदलासाठी वारंवार मागणी होत होती. २००९ नंतर भरती झालेल्या जवानांना १५ वर्षे सेवा केल्यानंतर त्यांचा अर्ज आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंत्रालयात आज त्याबाबत झालेल्या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृह सचिव मनूकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, एसआरपीच्या प्रमुख अर्चना त्यागी आदी उपस्थित होते.

Web Title: Inter-district transfer condition of SRP personnel canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.