आंतरराज्यीय टोळीतील आरोपी २ वर्षे मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:57 AM2017-09-25T00:57:17+5:302017-09-25T00:57:26+5:30
बनावट शस्त्र परवान्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी नेस्तनाबूत केलेल्या आंतरराज्यीय टोळीतील प्रवीण परमार नावाचा एक आरोपी आजही मोकाट असल्याने पोलीस याबाबत का ढिम्म आहेत
मुंबई : बनावट शस्त्र परवान्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी नेस्तनाबूत केलेल्या आंतरराज्यीय टोळीतील प्रवीण परमार नावाचा एक आरोपी आजही मोकाट असल्याने पोलीस याबाबत का ढिम्म आहेत, असा सवाल केला जात आहे. विशेष म्हणजे आरोपीचा अटकपूर्व जामीनही मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
जुलै २0१५ दरम्यान ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी बनावट शस्त्र परवाने तयार करून त्यावर शस्त्रास्त्रे विकणारी एक आंतरराज्यीय टोळी पकडली होती. या टोळीकडून २७ बनावट शस्त्र परवाने तसेच ४0 लाख रुपये किमतीची ३१ शस्त्रे
हस्तगत करण्यात आली होती. त्यात ११ रायफल, आठ पिस्तुले आणि १२ रिव्हॉल्वरचा समावेश होता.
या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली होती. मीरा रोड परिसरात निदान सिंह संतोक सिंह या आरोपीला जुलै २0१५ मध्ये शस्त्रास्त्रे कायद्याखाली अटक करण्यात आल्यावर पोलिसांना या आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला. त्यानंतर या प्रकरणात विश्वनाथ राघव शेट्टी, मुडसिंह राजपूत, सूरजसिंह
गुमानसिंह राजपूत, परमवीरसिंह सोलंकी, गजेंद्र कर्नासिंह भाटी आणि संतोषसिंह सिंह या सहा जणांना अटक करण्यात आली.
याच प्रकरणात मुंबईतील प्रवीण हस्तीमल परमार नावाच्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता. पण काही अधिकाºयांबरोबर असलेल्या संबंधांमुळे त्याला अटक झाली नाही. याच काळात त्याला ़अटकपूर्व जामीन मिळविण्याची संधी देण्यात आली. परंतु मुंबई उच्च न्यायालयात न्या. ए.एस. गडकरी यांनी परमारचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला. असे असतानाही पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही, ही टोळी पंजाबमधून बनावट शस्त्र परवाने तयार करवून घ्यायची आणि ती मुंबई, ठाणे परिसरात शस्त्रांसह तीन ते पाच लाख रुपयांना विकायची, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.