‘इंटरसिटी’ची चाचणी लांबणीवर; वेळेची बचत करणाऱ्या पूश-पूल इंजिनाला विलंब
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 01:14 AM2019-06-08T01:14:56+5:302019-06-08T06:13:13+5:30
तांत्रिक अडचण आणि कर्जत थांबा रद्द केल्याने इंटरसिटी एक्स्प्रेसची चाचणी लांबणीवर गेली. ६ जूनपर्यंत इंटरसिटीची चाचणी घेतली नाही.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून मुंबई ते पुणे चालविण्यात येणाºया इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन जोडण्यात आले आहे. पूश-पूलद्वारे इंटरसिटी एक्स्प्रेसची चाचणी ३० मेपासून ते ६ जूनपर्यंत घेणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेची बचत करणाºया पूश-पूल इंटरसिटी एक्स्प्रेसची वाट बघावी लागणार आहे.
मुंबई ते पुणे चालविण्यात येणाºया मेल, एक्स्प्रेसद्वारे ३ तास १५ मिनिटांचा कालावधी लागतो. वेळेत बचत करण्यासाठी आणि एक्स्प्रेसची घाट भागात क्षमता वाढविण्यासाठी पूश-पूल इंजीन जोडण्यात आले. त्याची ३० मेपासून ते ६ जूनपर्यंत चाचणी घेण्याचे ठरले होते. पहिल्या दिवशी चाचणी घेण्यात आली. या वेळी इंटरसिटी एक्स्प्रेस कर्जत येथे थांबा न घेता चालविण्यात आली. त्यानंतर पुढील चाचणीत तांत्रिक अडचण आल्याने इंटरसिटी एक्स्प्रेस वेळेत पोहोचली नाही.
तांत्रिक अडचण आणि कर्जत थांबा रद्द केल्याने इंटरसिटी एक्स्प्रेसची चाचणी लांबणीवर गेली. ६ जूनपर्यंत इंटरसिटीची चाचणी घेतली नाही. त्यामुळे चाचणीची मुदतवाढ करून चाचणी प्रक्रिया ११ जूनपर्यंत करण्यात येणार आहे.
पूश-पूल इंजीन लावल्याने २ तास ३५ मिनिटांत मुंबई ते पुणे प्रवास करणे शक्य होणार आहे, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या ४० मिनिटांची बचत मुंबई ते पुणे प्रवास करताना होणार आहे. मात्र इंटरसिटी एक्स्प्रेस पूश-पूल इंजीन जोडून ९ वाजून २० मिनिटांनी पुण्याला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र एक्स्प्रेस २० ते ३० मिनिटांचा अधिक कालावधी घेत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
कर्जत थांबा रद्द केल्याने प्रवासी नाराज
मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसच्या प्रवासात वेळेची बचत होण्यासाठी कर्जत थांबा रद्द करण्यात आला. कर्जत थांब्याहून दररोज ३०० ते ४०० प्रवासी इंटरसिटी एक्स्प्रेसमधून प्रवास करतात.
कर्जत थांबा रद्द केल्याने इतर एक्स्प्रेसमधून प्रवास करताना गर्दीला सामोरे जावे लागते. यासह कर्जत थांबा रद्द केल्याने येथील प्रवाशांचा पास वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंटरसिटी एक्स्प्रेसचा कर्जत थांबा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांसह मध्य रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती सदस्य नितीन परमार यांनी केली.