पूश-पूलमुळे इंटरसिटीची वाचणार ४० मिनिटे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 06:06 AM2019-05-27T06:06:25+5:302019-05-27T06:06:55+5:30

मुंबई ते पुणे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन बसविण्यात आले आहे.

Intercity will read 40 minutes due to Push-Pool | पूश-पूलमुळे इंटरसिटीची वाचणार ४० मिनिटे

पूश-पूलमुळे इंटरसिटीची वाचणार ४० मिनिटे

Next

मुंबई : मुंबई ते पुणे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन बसविण्यात आले आहे. यामुळे इंटरसिटी एक्स्प्रेसचा वेग आणि क्षमता वाढल्याने मुंबई ते पुणे प्रवासामधील ३५ ते ४० मिनिटांची बचत होणार आहे. यापूर्वी या प्रवासास साधारण ३ तास १५ मिनिटांचा कालावधी लागत होता, पूश-पूल इंजीन लावल्याने २ तास ३५ मिनिटांत मुंबई ते पुणे प्रवास करणे शक्य होणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन लावून चाचणी घेतली होती. ही चाचणी यशस्वी झाली आहे. मुंबई विभागाकडील प्रस्ताव पुणे विभागाकडे पाठविण्यात आला आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन बसविण्यात आले असून या एक्स्प्रेसला एलएचबी डबे बसवण्यात आले आहेत.
मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करताना खंडाळा घाट पार करण्यासाठी कर्जत येथे बॅकर इंजीन लावण्यात येते. त्यानंतर बॅकर इंजीन लोणावळा येथे काढण्यात येते. या कामात वेळ जात असल्याने रेल्वे प्रशासनाने इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन लावण्याचा पर्याय निवडला आहे.
>मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन या दरम्यान चालविण्यात येणाºया राजधानी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन बसविण्यात आले आहे. त्यामुळे राजधानी एक्स्प्रेस घाट भाग कमी वेळात पार करते. त्यानंतर डेक्कन क्वीनला पूश-पूल इंजीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन बसविल्यामुळे घाट भागात चढ-उतार करणे सोयीस्कर झाले आहे.

Web Title: Intercity will read 40 minutes due to Push-Pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.