म्हाडा सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 06:33 AM2020-07-09T06:33:40+5:302020-07-09T06:34:00+5:30
मुंबई मंडळाने काढलेल्या सर्वसाधारण सदनिका सोडत व गिरणी कामगार सदनिका सोडतीमधील सुमारे ७०० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना तसेच कोकण मंडळातर्फे सन २०१४, २०१६ व २०१८ मध्ये काढलेल्या सदनिका सोडतींमधील सुमारे १००० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
मुंबई : म्हाडाच्यामुंबई व कोकण या विभागीय मंडळांतर्फे काढलेल्या विविध सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबर २०२० पर्यंत बिनव्याजी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई मंडळाने काढलेल्या सर्वसाधारण सदनिका सोडत व गिरणी कामगार सदनिका सोडतीमधील सुमारे ७०० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना तसेच कोकण मंडळातर्फे सन २०१४, २०१६ व २०१८ मध्ये काढलेल्या सदनिका सोडतींमधील सुमारे १००० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
कोरोना प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सोडतीतील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेच्या विक्री किमतीचा भरणा विहित वेळेत करता आला नाही. त्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.