Join us

इच्छुक उमेदवारांचा व्हॉट्स अॅप, फेसबुकवर भर

By admin | Published: September 21, 2014 1:01 AM

विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांकडून यंदा सोशल मीडियाचा वापर वाढला आहे.

नवी मुंबई : विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांकडून यंदा सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. उमेदवारी घोषित होणो बाकी असतानाच इच्छुकांकडून फेसबुक आणि  व्हॉट्स अॅप वर आपल्या प्रचाराचा जोर धरला आहे.
हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्ट फोन आल्याने सोशल मीडियाद्वारे उमेदवाराचा प्रचार करणो सहज व सोपे झाले आहे. सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार आपण केलेल्या कामांची माहिती व फोटो व्हॉट्स अॅप व फेसबुकवर शेअर करत आहेत. गत लोकसभा निवडणुकीत प्रथमच सोशल मीडियाची ताकद सर्व राजकीय पक्षांना दिसून आली. हीच बाब लक्षात घेऊन यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी सोशल मिडीयावर जोर धरला आहे.
जिल्हयाचे पालकमंत्री गणोश नाईक व ऐरोलीचे विद्यमान आमदार संदीप नाईक हे त्यात प्रमुख आघाडीवर आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे मोबाइल अॅप्लीकेशनच तयार करण्यात आले आहे. गत कार्यकाळात त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांच्या माहितीसह आवश्यक संपर्क नंबर त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेत. त्यानुसार या अॅप्लिकेशनचा पुरेपूर वापर राष्ट्रवादीच्या नगरसेवक व कार्यकत्र्याकडून प्रचारासाठी होताना दिसत आहे. त्यापैकी बहुतांश नगरसेवकांनी यापूर्वी कधी फेसबुक म्हणजे काय हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केलेला नसावा. शिवसेनेतर्फेऐरोली मतदार संघातून इच्छुक उमेदवारांमध्ये जिल्हा प्रमुख विजय चौगुले व युवा सेना अधिकारी वैभव नाईक यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे उमेदवारी घोषीत होण्यापुर्वीच या दोघांनीही सोशल मीडियाची यंत्रणा सक्रिय केली आहे. यासाठी विशेष फोटो इमेज बनवणा-या तज्ञांचेही सहकार्य घेतले जात आहे. वैभव नाईक यांची संपूर्ण युवा कार्यकत्र्याची फळीच फेसबुकवर एकत्र झाली आहे. या प्रत्येकाकडून वैभव नाईक यांच्या प्रचारावर जोर दिला जात आहे. बेलापूर मतदार संघामध्ये भाजपातून इच्छुक असलेल्या मंदाताई म्हात्रे ह्या देखील सोशल मीडियाच्या प्रचारात मागे नाहीत. (प्रतिनिधी)
 
च्काही जणांकडून सोशल मीडियावरही राजकीय टीका टिपण्णी देखील होत आहे. अशा वेळी प्रतीउत्तर देण्यासाठीही अनेकांनी ठराविक सक्रीय मंडळींना नेमले आहे. 
च्या सर्वाकडून केल्या जाणा:या पोस्टवर अधिकाधिक कमेंट अथवा लाइक कशा मिळतील याचाही पुरेपुर प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच नवी मुंबईत सोशल मीडियावर राजकीय युद्ध पेटल्याचे दिसत आहे.