Join us

Budget 2019: रेल्वे प्रवाशांचे अर्थसंकल्पावर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 5:31 AM

शुक्रवारी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात मुंबई आणि राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस निधीची तरतूद व्हावी, अशी रेल्वे प्रवाशांची इच्छा आहे.

मुंबई : शुक्रवारी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात मुंबई आणि राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस निधीची तरतूद व्हावी, अशी रेल्वे प्रवाशांची इच्छा आहे. मागील अनेक वर्षांपासून मुंबई नागरी परिवहन प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे ते प्रकल्प पूर्ण करून भविष्यात कोणत्या प्रकल्पांची घोषणा करण्यात येणार आहे आणि किती निधी पुरविण्यात येणार आहे, याची उत्सुकता रेल्वे प्रवाशांना आहे.मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा २ च्या (एमयूटीपी २) अंतर्गत मुंबई सेंट्रल ते बोरीवली या स्थानकांदरम्यान सहावी मार्गिका, सीएसएमटी ते कुर्ला पाच आणि सहावी मार्गिका, ठाणे ते दिवा पाच आणि सहावी मार्गिका आणि अंधेरी ते गोरेगाव रेल्वे विस्तार या प्रकल्पांचा समावेश होता. मात्र यातील फक्त अंधेरी ते गोरेगाव रेल्वे विस्तार हा प्रकल्प मार्गी लागला आहे. इतर प्रकल्प संथ गतीने सुरू आहेत. २०१९ या वर्षी या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास नागरिकांना फायदा होईल.२०१५-१६ साली एमयूटीपी प्रकल्प ३ मंजूर करण्यात आला. याअंतर्गत विरार ते डहाणू प्रकल्प, पनवेल-कर्जत दोन रेल्वे मार्गिका यांना मंत्रिमंडळाकडून परवानगी मिळाली आहे. पनवेल-कर्जत दोन रेल्वे मार्गिका प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन देण्याची शक्यता२०१९ ची निवडणूक लक्ष्य करून विद्यमान सरकार भरघोस घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे लक्ष आजच्या अर्थसंकल्पावर राहणार आहे.अशी आहे अपेक्षाएमयूटीपी प्रकल्प २, ३, ३ ए या प्रकल्पांना जादा निधी उपलब्ध करून देणे, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डबे लोकल चालविण्यात यावी, जोगेश्वरी स्थानकाला टर्मिनस करणे यांसह अनेक प्रकल्पांची पूर्तता करण्यात यावी अशी अपेक्षा प्रवाशांची आहे.

टॅग्स :अर्थसंकल्प 2019रेल्वे