बारामती अ‍ॅग्रो प्रकरणात आमदार रोहित पवारांना १६ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम दिलासा

By दीप्ती देशमुख | Published: October 6, 2023 12:09 PM2023-10-06T12:09:51+5:302023-10-06T12:10:12+5:30

MPCB ला उत्तर देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Interim relief to MLA Rohit Pawar in Baramati Agro case till October 16 | बारामती अ‍ॅग्रो प्रकरणात आमदार रोहित पवारांना १६ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम दिलासा

बारामती अ‍ॅग्रो प्रकरणात आमदार रोहित पवारांना १६ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम दिलासा

googlenewsNext

दीप्ती देशमुख, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोवर १६ ऑक्टोबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ (MPCB) दिले. तसेच कारखान्याच्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश एमपीसीबीला दिले. न्या. नितीन जामदार व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे बारामती अ‍ॅग्रोने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री २ वाजता बारामती अ‍ॅग्रोचे दोन प्लांट ७२ तासांत बंद करण्याचे निर्देश दिले होते. या विरोधात रोहित पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने पवारांना ६ ऑक्टोबरपर्यंत दिलासा दिला होता. शुक्रवारच्या सुनावणीत न्यायालयाने एमपीसीबीला १६ ऑक्टोबरपर्यंत बारामती अ‍ॅग्रोवर कारवाई न करण्याचे निर्देश दिले. तसेच याचिकेवर उत्तर दाखल करण्याचेही निर्देश दिले. कारखान्याचे अध्यक्ष आमदार असल्याने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी राजकीय हेतूने कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

Web Title: Interim relief to MLA Rohit Pawar in Baramati Agro case till October 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.