आयआयटीत अंतर्गत चौकशी सुरू; पदवी अभ्यासक्रमात बदलाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 07:12 AM2023-02-19T07:12:37+5:302023-02-19T07:12:53+5:30

दर्शनच्या आत्महत्येमुळे आयआयटी परिसरात खळबळ उडाली. जातीय भेदभावामुळे सोलंकीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे

Internal inquiry begins in IIT; Indication of change in degree course | आयआयटीत अंतर्गत चौकशी सुरू; पदवी अभ्यासक्रमात बदलाचे संकेत

आयआयटीत अंतर्गत चौकशी सुरू; पदवी अभ्यासक्रमात बदलाचे संकेत

googlenewsNext

मुंबई : गेल्या आठवड्यात आयआयटी विद्यार्थी दर्शन सोलंकी याने आत्महत्या केली. या घटनेची दखल घेत संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने अंतर्गत चौकशीला सुरुवात केली आहे. आयआयटी, मुंबईचे मुख्य दक्षता अधिकारी प्रा. नंदकिशोर हे या समितीचे प्रमुख आहेत.  

दर्शनच्या आत्महत्येमुळे आयआयटी परिसरात खळबळ उडाली. जातीय भेदभावामुळे सोलंकीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समितीची स्थापना केली. या समितीमध्ये संस्थेतील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थी मार्गदर्शक समन्वयक, संस्थेच्या रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अल्पसंख्याक विद्यार्थी संघटनेचे सदस्य इत्यादींचा समावेश आहे. 

संबंधित प्रकरणाविषयी कोणाला काही माहिती असल्यास समिती वा पवई पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन आयआयटी मुंबई प्रशासनाने केले आहे. पोलिसांनी सोलंकीचा मोबाइल फॉरेन्सिक चाचणीसाठी ताब्यात घेतला आहे. दरम्यान, सोमवारी, २० फेब्रुवारी रोजी सकाळी विविध विद्यार्थी व सामाजिक संघटना आयआयटीविरोधात मोर्चा काढणार आहेत. 

तणाव मुक्तीसाठी

विद्यार्थ्यांना येणारा ताणतणाव पाहता लवकरच आयआयटी मुंबई पदवी अभ्यासक्रमात बदल करणार आहे, त्याविषयीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती संस्थेच्या प्रशासनाने दिली आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत असून सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने याविषयी अधिक भाष्य करू शकत नाही, असे म्हणत विद्यार्थ्यांच्या समुपदेशन, मदतीसाठी असणारी संस्थेतील यंत्रणा कार्यरत असून अधिकाधिक आधार देण्यासाठी कायम पुढाकार घेत असते असे संस्थेने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी कल्याण केंद्राच्या अनिषा मॅथ्यू या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी कार्यशील आहेत. यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना या माध्यमातून मदत करण्यात आली आहे.

Web Title: Internal inquiry begins in IIT; Indication of change in degree course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.