मनोहर कुंभेजकर ल्ल वांद्रे
दिवाळीच्या सुटीत मुंबईकरांना सर्कसचे वेध लागतात. सर्कस म्हणजे लहान मुलांना एक पर्वणीच असते. लहान मुलांसह सर्वच वयोगटांतील व्यक्ती सर्कसचा मनमुराद आनंद लुटतात. सर्कससाठी जागा शोधणो, विविध प्रकारच्या परवानग्या मिळवून आंतरराष्ट्रीय कलाकारांना सहभागी करून सर्कसचे खेळ दाखवणो ही सर्कसच्या मालकांसाठी एक तारेवरची कसरत ठरते. परंतु, रॅम्बो सर्कसचे मालक सुजित दिलीप यांची तिसरी पिढी सर्कसच्या व्यवसायात पाय रोवून भक्कमपणो उभी आहे.
सर्कसमध्ये प्राण्यांचा खेळ दाखवण्यावर आलेली बंदी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध प्रकारचे थरारक खेळ शरीर आणि मन यांचा संगम साधून चपळाईने केलेल्या शारीरिक कसरती पाहून मुंबईचे प्रेक्षक थक्क होणार असल्याचे सुजित दिलीप यांनी म्हटले आहे.
वांद्रे (प़) येथील रेक्लमेशन ग्राउंडवरील वातानुकूलित तंबूत आणि मुंबईत प्रथमच रॅम्बो सर्कसचा आंतरराष्ट्रीय सर्कस महोत्सव भरला आहे. पहिल्या दिवसापासूनच या सर्कसला चिमुरडय़ांसह त्यांच्या पालकांनी गर्दी केली होती. भारतातील पारंपरिक सर्कसच्या दर्दी कलाकारांसह आणि दक्षिण आफ्रिका, नेपाळ, उझबेकिस्तान, मॉरिशस या देशांतील सुमारे 15क् कलाकारांचा सहभाग आणि विविध प्रकारच्या प्राण्यांचा सहभाग, आकर्षक प्रकाशयोजना, अग्निप्रतिबंधक यंत्रणा हे या आंतरराष्ट्रीय सर्कस महोत्सवाचे खास आकर्षण आहे.
तीन वर्षाखालील मुलांना सर्कससाठी मोफत प्रवेश आहे. चार डिसेंबर्पयत रोज दुपारी एक, चार आणि सात वाजता सर्कसचे खेळ आहेत. सर्कसला प्रोत्साहन मिळून सर्कस जिवंत राहण्यासाठी गेली काही वर्षे कपूर घराण्याच्या पृथ्वी थिएटरने या सर्कसला पूर्ण सहकार्य दिले आहे. जागतिक सर्कसदिनी या ठिकाणी सर्कसचे आयोजन देखील केले जाते.