Join us

निवडणूक आयोगातर्फे आंतरराष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 5:46 AM

घटनेतील ७३ आणि ७४ व्या दुरुस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्य निवडणूक आयोगातर्फे २५ आणि २६ आॅक्टोबर रोजी ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे.

मुंबई : घटनेतील ७३ आणि ७४ व्या दुरुस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्य निवडणूक आयोगातर्फे २५ आणि २६ आॅक्टोबर रोजी ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पत्र परिषदेत ही माहिती दिली. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन होईल. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २६ला समारोप होणार आहे. वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे असतील. जनतेकडील लोकशाहीचे स्वामित्व, निवडणुकांतील पैशांचा गैरवापर, वंचित, उपेक्षित घटकांचा सहभाग, खोट्या बातम्या व समाज माध्यमांचा गैरवापर, हितधारकांची भूमिका या विषयांवर चर्चासत्रे होतील.