आजपासून आंतरराष्ट्रीय एलिव्हेटर व एस्केलेटर प्रदर्शन
By admin | Published: March 17, 2016 02:20 AM2016-03-17T02:20:02+5:302016-03-17T02:20:02+5:30
गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये गुरुवारी, १७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय एलिव्हेटर व एस्केलेटर प्रदर्शनाची सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाच्या
मुंबई : गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये गुरुवारी, १७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय एलिव्हेटर व एस्केलेटर प्रदर्शनाची सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाच्या सहाव्या पर्वाचे उद्घाटन होणार असून १९ मार्चपर्यंत ते प्रेक्षकांसाठी खुले असेल.
या प्रदर्शनामुळे नवे तंत्रज्ञान व उपकरणे, विविध कंपन्यांसोबत करार आणि ग्राहकांना उत्तम दर्जाच्या सेवा मिळणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. एलिव्हेटर उद्योगात २०१८ सालापर्यंत भारतीय बाजारपेठेत दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यताही आयोजकांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने हे प्रदर्शन अधिक महत्त्वाचे मानले जात आहे.
गुरुवारी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री प्रदर्शनाचे उद्घाटन करणार असून त्यांच्यासोबत खासदार अमर साबळे आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असेल. ग्राहकांना नवे ट्रेंड्स आणि तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. प्रदर्शनात जगभरातील अद्ययावत असलेल्या हायस्पीड एलिव्हेटर, होम लिफ्ट्स, स्टेअर लिफ्ट्स, पार्किंग एलिव्हेटर्स, एस्केलेटर्स पाहता येतील.