आयटीआयमध्ये सुरू होणार आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्र; बेरोजगारांना फायदा

By स्नेहा मोरे | Published: September 5, 2023 06:57 PM2023-09-05T18:57:31+5:302023-09-05T18:57:38+5:30

या केंद्राचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्या सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी ४ वाजता होणार आहे.

International Employment Center to be opened in ITI; Benefits to the unemployed | आयटीआयमध्ये सुरू होणार आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्र; बेरोजगारांना फायदा

आयटीआयमध्ये सुरू होणार आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्र; बेरोजगारांना फायदा

googlenewsNext

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभाग, राज्य सरकार यांच्यामार्फत प्रथमच नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्र निर्माण करण्यात आले आहे. यात राज्यातील कुशल आणि उमेदवारांसाठी इतर देशांमध्ये आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देणे आणि आंतरराष्ट्रीय सल्लागार सेवांचा लाभ मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्रामार्फत परदेशात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्यातील उमेदवारांची नोंदणी, डेटाबेस तयार करणे, प्रशिक्षण देणे हे उपक्रम राबवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलिया, जपान, स्पेन, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, युनायटेड किंगडम, यूएसए, दक्षिण कोरिया, थायलंड आणि इतर अनेक प्रमुख देशांचे वाणिज्य दूत या समारंभाला उपस्थित राहणार आहेत, तसेच भारतात कार्यरत असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट एजंसी त्याचबरोबर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त एन. रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी उपस्थित राहणार आहेत.

या केंद्राचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्या सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी ४ वाजता होणार आहे. यावेळी आयटीआयमधील ५८ विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित राहणार आहेत.

Web Title: International Employment Center to be opened in ITI; Benefits to the unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.