आंतरराष्ट्रीय वन दिन : १५ ठिकाणी नागरी वने विकसित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:06 AM2021-03-22T04:06:18+5:302021-03-22T04:06:18+5:30

पर्यावरण विषयक जाणीव-जागृतीच्या उपक्रमाचे मुंबईकरांनी केले कौतुक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आंतरराष्ट्रीय वन दिना निमित्त वनांचे संरक्षण व ...

International Forest Day: Urban forests will be developed in 15 places | आंतरराष्ट्रीय वन दिन : १५ ठिकाणी नागरी वने विकसित होणार

आंतरराष्ट्रीय वन दिन : १५ ठिकाणी नागरी वने विकसित होणार

Next

पर्यावरण विषयक जाणीव-जागृतीच्या उपक्रमाचे मुंबईकरांनी केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आंतरराष्ट्रीय वन दिना निमित्त वनांचे संरक्षण व संवर्धन यासह अर्बन फॉरेस्ट अर्थात नागरी वनांच्या जागृतीच्या अनुषंगाने रविवारी मुंबई महापालिकेने आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून मुंबईतील मियावाकी वनांबाबत सकाळी ६ ते रात्री १० अशी सलग १६ तास माहिती मुंबईकरांना दिली. या संवाद व जाणीव जागृती प्रयोगाचे मुंबईकरांनी स्वागत केले. अतिरिक्त महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या उद्यान विभागाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान, गेल्या वर्षभरात मुंबईत ४३ मियावाकी वने विकसित करून त्यामध्ये २ लाख २१ हजारांपेक्षा अधिक झाडे लावण्यात आली आहेत. तर आणखी १५ ठिकाणी नागरी वने विकसित करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.

Web Title: International Forest Day: Urban forests will be developed in 15 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.