- कुलदीप घायवटमुंबई : महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून, शिक्षणासाठी घरापासून दूर जात असलेल्या विद्यार्थिनींना इतर मुलींच्या आधाराची गरज असते. अशा मुलींना आधार देण्यासह स्वातंत्र्यांची जाणीव करून देण्यासाठी गोवंडीतील १८ वर्षीय तरुणी धडपडत आहे. ‘सावित्री पुरस्कार २०१७’ प्राप्त सलेहा खान, गोवंडीमधील मुलींना स्वयंशिस्तीचे धडे, मासिक पाळीविषयीचे गैरसमज, शिक्षणाचे महत्त्व याबाबत जागृती करण्याचे काम करत आहे. ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिना’चे औचित्य साधत ‘लोकमत’ने तिच्याशी साधलेला खास संवाद वाचकांसाठी.आधुनिक जगात मुलींची शिक्षणासाठीची पावले खुंटली आहेत?मुंबईत अनेक भागांतील मुलींना शिक्षणापासून परावृत्त केले जात आहे. गोवंडी भागातील मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी रोखले जाते. कारण घरापासून महाविद्यालयाचे अंतर दूर असते. त्यामुळे रस्त्यावरील मुलांकडून मुलींची छेड काढली जाते. त्यामुळे मुलींचे मानसिक खच्चीकरण होते.म्हणून पालक मुलींना घरी बसून घरकाम शिकवतात. माझ्या आयुष्यात असाच प्रसंग आला. त्यातून मी योग्य मार्ग काढून पालकांची समजूत काढून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. माझ्यावर आलेला प्रसंग इतरांवर येत असल्याने, मी परिसरातील मुलींच्या शिक्षणाची दारे उघडी करत आहे.मासिक पाळीविषयीच्या गैरसमजाविषयी काय सांगाल?मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोलले जात नाही. पूर्वी मासिक पाळी सुरू झाल्यावर मुलींना स्वयंपाकगृहात, घरात येऊ दिले जात नव्हते.आताही थोड्या-फार प्रमाणात परिस्थिती बदली असली, तरीजागृती निर्माण होणे आवश्यकआहे. आतापर्यंत ३०० मुलींनामासिक पाळीविषयी माहितीदिली आहे. १० मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सहकार्य करत आहे.उज्ज्वल भविष्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे?समाजातील पुरुष आणि महिलांनी मुलींविषयी विचार करण्याची मानसिकता बदलली पाहिजे. मुलींना फक्त घरकामासाठी न रावबिता, तिला उंच शिखरे गाठण्याची संधी दिली पाहिजे. काही समाजकंटक मुलींकडे वाईट नजरेने पाहतात. त्यामुळे मुलींना घराबाहेर पडणे कठीण होते. समाजानेच पुढाकार घेऊन मुलींच्या उज्ज्वल भविष्याचा विचार केला पाहिजे.
आंतरराष्ट्रीय बालिका दिन :अस्तित्वासाठी ‘ती’ धडपडतेय...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 5:17 AM