बोरिवलीत साकारले आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग रिंक, बॉक्सिंग आणि बास्केटबॉल क्रीडा संकुल
By मनोहर कुंभेजकर | Published: January 13, 2023 04:06 PM2023-01-13T16:06:35+5:302023-01-13T16:06:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरिवली येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोरिवली स्केटिंग रिंक, बॉक्सिंग आणि बास्केटबॉल क्रीडा संकुलाचे उद्घाटन काल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरिवली येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोरिवली स्केटिंग रिंक, बॉक्सिंग आणि बास्केटबॉल क्रीडा संकुलाचे उद्घाटन काल रात्री मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अँड.आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांच्या संकल्पनेतून विशेषत: तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे.
कांदिवली पश्चिम , पवनधाम, महावीर नगर,आयोजित या कार्यक्रमात आमदार सुनील राणे, परिमंडळ ७ च्या पालिका उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, सरचिटणीस - आईस स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस जे.एस. साहनी, कुस्तीपट्टू,ऑलिम्पिक अँथलिट नरसिंह पंचम यादव, बोरिवली भाजप महिला मोर्चा अध्यक्ष रेश्मा निवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या आधुनिक क्रीडा संकुलातून अनेक दर्जेदार खेळाडू तयार होतील आणि बोरिवली हे राज्य आणि देशासाठी क्रीडा क्षेत्रात नावाजलेले नाव म्हणून उदयास येतील असा विश्वास बोरीवलीकरांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी आमदार सुनील राणे म्हणाले की, गेल्या वर्षी आम्ही बोरिवलीसाठी अत्याधुनिक क्रीडा संकुलाची घोषणा केली होती आणि आज आम्ही बोरिवलीच्या स्थानिक नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोरिवली स्केटिंग रिंक, बॉक्सिंग आणि बास्केटबॉल क्रीडा संकुलाचे उद्घाटन केले. तरुणांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवण्यासाठी अनेक आरोग्य प्रकल्प राबविण्यात येत आहेत, जेणेकरून ते त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उत्कृष्ट कामगिरी करू शकतील.