महाराष्ट्र बजेट 2020: वरळी डेअरीच्या जागेवर होणार आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 05:35 AM2020-03-07T05:35:42+5:302020-03-07T05:36:13+5:30

मुंबई येथील शासकीय दूध योजनेच्या १४ एकर जागेवर एक हजार कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे.

International tourist package to be set up at Worli Dairy | महाराष्ट्र बजेट 2020: वरळी डेअरीच्या जागेवर होणार आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुल

महाराष्ट्र बजेट 2020: वरळी डेअरीच्या जागेवर होणार आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुल

Next

मुंबई : वरळी; मुंबई येथील शासकीय दूध योजनेच्या १४ एकर जागेवर एक हजार कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. हे पर्यटन केंद्र सिंगापूरच्या धर्तीवर असेल. त्या ठिकाणी जगातील सर्वात सुंदर अशा मत्स्यालयाची उभारणी केली जाणार आहे. या शिवाय पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधा अन् केंद्रांचाही समावेश असेल. या ठिकाणी फार जुनी शासकीय दूध योजना आहे.
कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध
वित्त मंत्र्यांच्या घोषणेनंतर कर्मचाºयांमध्ये नाराजीचे सूर उमटले. बृहन्मुंबई मध्यवर्ती राज्य कर्मचारी संघाचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख म्हणाले की एकेक करून मुंबईतील सरकारी डेअरी संपविल्या जात आहेत. कर्मचाºयांना अन्यत्र हलविले जात आहे. वरळीच्या डेअरीला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात आणि त्याचा फायदा हजारो दूध उत्पादक शेतकºयांना होऊ शकतो, पण सरकारचे काही करण्याची इच्छा नाही. वरळी डेअरी बंद करण्याच्या निर्णयाचा आम्ही नक्कीच विरोध करू.
>मातोश्रीवरून आदेश येताच...
या जागेच्या वापरात शासनाला बदल करावा लागेल याकडे नंतर पत्रकारांनी लक्ष वेधले असता अजित पवार म्हणाले, मुख्यंमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत. ती जमीन राज्य शासनाच्याच मालकीची आहे. निर्णय घेण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे. मुंबई महापालिकेकडून काही परवानगी घ्यायच्या असतील तर मातोश्रीवरून एक फोन गेला की काम होईल. पवार यांच्या या विधानास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हसून दाद दिली.
आदित्य यांचा मतदारसंघ
वरळी हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. आपल्या मतदारसंघात एक महत्त्वाकांक्षी केंद्र आणण्यात पहिल्याच वर्षी आदित्य यांना यश आले आहे.

Web Title: International tourist package to be set up at Worli Dairy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.